Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

विक्रमी खरीप पेरणीचे उद्दिष्ट साध्य होईल का?

राज्यात पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्यात माॅन्सून (Monsoon In Maharashtra) दाखल झाला, पण पाऊस (Rain) नाही. जूनमध्ये आत्तापर्यंत सरासरीच्या तब्बल ५४ टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. (Sowing Delayed) तुरळक ठिकाणी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे खरिपाखालील क्षेत्र (Kharif Sowing Acreage) वाढविण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता धुसर दिसत आहे.

संपूर्ण राज्य माॅन्सूनने व्यापून आता तीन दिवस झाले. पण संपूर्ण राज्यात माॅन्सून सक्रिय झाला नाही. राज्यातील काही भागांत पाऊस झाला. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस नाही. त्यामुळे राज्यातील खरीप पेरण्यांना उशीर होत आहे. त्यातच राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यात १ जून ते २० जून या काळात गेल्यावर्षीपेक्षा पावसाचं प्रमाण ५४ टक्क्यांनी कमी आहे.

मागील वर्षी या कालावधीत ११९.३ टक्के पाऊस पडला होता. यंदा मात्र केवळ ५४.३ टक्के पाऊस झाला. पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. कृषी विभाग, कृषी आयुक्त, कृषिमंत्री यांनी ७५ ते १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये, असे आवाहन केले.

यंदा उष्णता अधिक होती. त्यामुळे धरणे भरल्यानंतर पाण्याचा वापर अधिक झाला. गेल्यावर्षी १६ जूनपर्यंत राज्यातील महत्वाच्या २९ जलाशयांमध्ये ५.५८ अब्ज घट मीटर पाणीसाठा होता. मात्र यंदा पाणीसाठा ४.८० अब्ज घन मीटरपर्यंत कमी झाला. राज्य सरकारला यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक पेरणीची अपेक्षा आहे. मात्र धरणांतील एकूण साठवण क्षमतेच्या २६ टक्के आहे.

धरणांतील घटलेला पाणीसाठा आणि कमी पाऊस यामुळे पेरणी ठप्प आहे. कृषी विभागाच्या मते राज्यात आत्तापर्यंत एक टक्काही पेरणी झाली नाही. यंदा १५१ लाख हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्र खरिपाखाली आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मागील हंगामात १४२.८३ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता. असे असले तरी चालू हंगामात मात्र पेरण्या अद्याप सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होईल का? याबाबत शाशंकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT