Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पावसाची उघडीप कायम राहणार?

राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. परंतु बहुतेक ठिकाणी पावासाची उघडीप होती. कोकणात शुक्रवारीही पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र होतं.

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्यात शुक्रवारी पावसाने बहुतांश भागांत विश्रांती (Rain Update Maharashtra) घेतली. मात्र पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी पावसाने हजेरी (Rainfall) लावली. हवामान विभागाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. परंतु बहुतेक ठिकाणी पावासाची उघडीप होती. कोकणात शुक्रवारीही पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र होतं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्ह्यांत अधून मधून पावसाच्या सरी पडत आहेत. मात्र सलग तीन ते चार दिवस पावसाची उघडीप असेलेल्या भागात लागवडीच्या कामाने वेग घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी झाल्या. सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. तर पुणे जिल्ह्यात काही भागांत सकाळी हलक्या सरी झाल्या. घाटमाथ्यावरही पावसाने हजेरी लावली. जोर अधिक होता.

मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांत पावसाची उघडीप आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांमध्ये आंतरमशागतीच्या कामांनी वेग घेतला. लातरू, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. अनेक ठिाकणी पावसाची रिमझीम सुरु होती. परभणी जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावासने हजेरी लावली.

विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस थांबला होता. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर बहुतांश ठिकाणी हलक्या सरी पडल्या. विदर्भात इतर ठिकाणी मात्र पावसाची उघडीप कायम होती. अमरावती, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यांतही पावसाने विश्रांती घेतली. तर अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यात बहुतांश भागांत पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी आंतरमशागतीसह कीडनाशक फवारणीची कामे करत आहेत.

भारतीय हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली. तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT