Farmer Suicide Agrowon
ताज्या बातम्या

Rahul Gandhi : शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ

शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्यातच माझ्या बापाने फाशी लावून घेतली, असे माहिती घाटंजी (जि. यवतमाळ) तालुक्यातील शिवम प्रकाश माणगावकर याने राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना दिली.

टीम ॲग्रोवन

अकोला : ‘‘शेतीसाठी घेतलेल्या कर्जाच्या (Agriculture Loan) ओझ्यातच माझ्या बापाने फाशी लावून घेतली, असे माहिती घाटंजी (जि. यवतमाळ) तालुक्यातील शिवम प्रकाश माणगावकर याने राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना दिली. चिमुकल्याची व्यथा ऐकून राहुल गांधीसुद्धा (Rahul Gandhi) काही काळ भावूक झाले. त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त (Farmer Suicide) कुटुंबातील सदस्यांची आस्थेने विचारपूस करीत हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

वाडेगाव ते बाळापूर दरम्यान भारत जोडो पदयात्रा यात्रा निघाली असताना बाळापूर जवळ एका टेंटमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी थांबले होते.

टिटवी येथील विद्या प्रकाश माणगावकर व त्यांचा मुलगा शिवम तसेच राजुरवाडी येथील जयश्री शंकर सायरी, भाग्यश्री व कुटुंबातील इतर सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. माणगावकर कुटुंबाची अडीच एकर शेती होती. त्यांच्यावर शेती आणि घरासाठी घेतलेले पाच लाखांचे कर्ज आहे.

ते फेडू न शकल्यामुळे त्यांनी १६ सप्टेंबर २०१७ रोजी आत्महत्या केली. त्यांची व्यथा जाणून घेत राहुल यांनी विद्या माणगावकर यांचे सांत्वन केले. विद्या यांनी त्यांची व्यथा मांडत शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत, अशी कळकळीची विनंती राहुल यांना केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT