Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : निळवंडे कालव्याच्या अडचणी दूर करूः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. २३) अचानक शिर्डी येथे येऊन संत साईबाबांचे दर्शन घेतले. या वेळी निळवंडे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निळवंडे कालव्यांच्या बंद कामाबाबत निवेदन दिले.

टीम ॲग्रोवन

नगर : ‘‘निळवंडे कालव्यांच्या (Nilwande Canal) कामाकडे माझे लक्ष आहे. ठरल्याप्रमाणे कालव्यांची चाचणी घेऊन या प्रकल्पाचे लोकार्पण करता यावे, यासाठी या कामातील अडचणी दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ,’’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी निळवंडे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी (ता. २३) अचानक शिर्डी येथे येऊन संत साईबाबांचे दर्शन घेतले. या वेळी निळवंडे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निळवंडे कालव्यांच्या बंद कामाबाबत निवेदन दिले.

स्टोन क्रशर बंद आहेत. वाळू मिळत नसल्याने कालव्यांची कामे बंद पडली. ठेकेदार कंपन्यांनी आपली यंत्रसामग्री अन्यत्र हलविली. त्यामुळे येत्या डिसेंबरअखेर कालव्यांची कामे पूर्ण होतील, असे वाटत नाही, असे निवेदनाद्वारे सांगितले.

त्यावर शिंदे यांनी लक्ष देण्याचे आश्‍वासन दिले. श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार व्हावा, नगर ते सावळीविहीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

‘एकही गाव कर्नाटकात जाणार नाही’

सीमावर्ती भागातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणी सामोपचाराने तोडगा काढण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. या प्रश्‍नी दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची नुकतीच बैठक झाली. केंद्र सरकारदेखील अनुकूल आहे. सीमावर्ती भागात पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. आता या प्रकरणात कुणी नवा वाद उत्पन्न करून गुंतागुंत वाढवू नये, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामानाची निर्मिती

Sugarcane Crushing Season: यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, सरकारचा निर्णय, पण साखर उतारा घटणार?

Crop Damage : घेवडा करपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी

SCROLL FOR NEXT