Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Industry : सातारा जिल्ह्यात पाचशे एकरांवर कृषी उद्योग उभारू

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, या साठी जिल्ह्यात ५०० एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारण्यात येईल. कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता.२५) येथे केली.

टीम ॲग्रोवन

सातारा : ‘‘महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला (Agriculture Produce) चांगला भाव मिळावा, या साठी जिल्ह्यात ५०० एकर क्षेत्रात कृषी उद्योग (Agriculture Industry) उभारण्यात येईल. कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शुक्रवारी (ता.२५) येथे केली.

कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, महेश शिंदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात विविध पिकांचे संशोधन होण्यासाठी बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लम्पी स्कीनमुळे दगावलेल्या जनावरांची मदतही देण्यात येत आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त भरविलेल्या या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीचे प्रशिक्षण मिळेल. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक उन्नती साधावी.’’ मंत्री सामंत म्हणाले, ‘‘कराडचे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरण केल्यास या विमानतळाचा चांगला विकास केला जाईल.’’

‘कृषी संशोधन केंद्र उभारणार’

देसाई म्हणाले, ‘‘कृष्णा-कोयना या नद्या शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम करीत आहेत. कराड, पाटण, सातारा येथील शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्याचा मानस आहे. या संकुलाद्वारे विविध पिकांचे संशोधन करण्यात येईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT