Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : पहाटे गारठा, दुपारी चटका

राज्यात थंडी-कमी अधिक होत असतानाच उन्हाचा चटका वाढत आहे. कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे गारठा, तर दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्यात थंडी-कमी (Cold Weather) अधिक होत असतानाच उन्हाचा चटका (Heat) वाढत आहे. कमाल आणि किमान तापमानातील (Minimum Temperature) तफावत वाढल्याने पहाटे गारठा, तर दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती आहे.

आज (ता. १०) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. राज्यात इतर भागतंतही थंडी जाणवत आहे. गुरुवारी (ता. ९) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९ अंश, तर जळगाव येथे ९.६ अंश तापमान नोंदले गेले. तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे.

पुढील दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, रविवारपासून पारा पुन्हा घसरण्याचा अंदाज आहे.

निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असून, राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. दिवसा उकाड्यातही वाढ झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात १३ ते २३ अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे.

गुरुवारी (ता. ९) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला आणि वाशीम येथे कमाल तापमान ३४ अंशांवर होते.

उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे. गुरुवारी (ता. ९) मध्य प्रदेशातील रेवा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.१०) जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.५ (११.७), जळगाव ३३.४ (९.६), धुळे ३१ (९), कोल्हापूर ३३.५ (१९.१), महाबळेश्‍वर ३० (१५.६), नाशिक ३३.१ (११.५), निफाड ३१.१ (८.५), सांगली ३५.२ (१७.७),

सातारा ३३.५ (१४.७), सोलापूर ३५.४ (१६.८), सांताक्रूझ ३३.६ (१९.४), डहाणू २७.९ (१७.९), रत्नागिरी ३२.७ (१९.३), औरंगाबाद ३३ (१०.५), नांदेड - (१५.२), परभणी ३३.८ (१४), अकोला ३४.५ (१२), अमरावती ३२.२ (१३.३),

बुलडाणा ३१ (१४.५), ब्रह्मपुरी ३३.२ (१३.४), चंद्रपूर ३१.८ (१४.६), गडचिरोली ३१.६ (१२.६), गोंदिया ३१ (१०.६), नागपूर ३२ (१२.४), वर्धा ३३.७ (१३.५), वाशीम ३४.२ (१५), यवतमाळ ३२ (१४.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT