Fodder Agrowon
ताज्या बातम्या

Fodder Seed : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारा बियाणे कधी मिळणार

Seed Subsidy : जिल्ह्यात चारा टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना चारा बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप केले जाते.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात चारा टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना चारा बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप केले जाते. लवकरात लवकर चारा बियाणे वाटप करा असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

परंतु एका महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असला तरी अद्यापही पशुसंवर्धन विभागाने चारा बियाणे वाटप करण्यासाठी कोणत्याही हाचलाची केल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे चारा बियाणे कधी मिळणार असा प्रश्न पशुपालक उपस्थित करु लागले आहेत.

जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चारा टंचाईची भीषणता वाढू लागली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदा चारा बियाणांसाठी एक कोटींच्या निधीची उपलब्धता केली आहे. ३० लाख रुपयांचे बियाणे देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संबंधित विभागाला अर्ज मागवण्यासाठी उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांची चारा बियाणे मागणी अर्ज घेत आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून चारा बियाणांसाठी मागणी आली आहे. जितक्या चारा बियाणांची मागणी आहे, तेवढी मागणी केली जाणार आहे. एका लाभार्थाला १५०० रुपये बियाणे देण्याचे नियोजन केले आहे.

शेतकऱ्यांनी चारा बियाणे मागणी केली आहे याची तालुकानिहाय याद्या वरिष्ठ कार्यालयाकडे प्राप्त होतात. त्यानंतर ड्रॉपध्दतीने शेतकऱ्यांनी निवड केली जाते, आणि शेतकऱ्यांना चारा बियाणे दिले जाते. मात्र, आयुक्त कार्यालयाने तातडीने चारा बियाणे वाटप करा असे आदेश दिले आहेत. परंतु जिल्हा पशुसंवर्धन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चारा बियाणे कधी मिळणार असा प्रश्न पशुपालक उपस्थित करु लागले आहेत.

निधीत केली वाढ

दरवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चारा बियाणेसाठी २५ लाखाच्या निधीची तरतूद केली जाते. तालुक्यातून किती शेतकरी चारा बियाण्यांची मागणी केली जाते, त्यानुसार बियाणे दिले जाते. परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वच तालुक्यात चारा टंचाई भासणार असल्याने चारा बियाणांच्या निधीत ७५ लाखांनी वाढ केली आहे. अर्थात यंदा बियाणांसाठी १ कोटी निधीची तरतूद केली आहे.

पहिल्या टप्प्यात ३० लाखांचे चारा बियाणांची मागणी केली आहे. चारा बियाणे आले की त्याचे वाटप केले जाईल. दुसऱ्या टप्प्यातील ७० लाखांचे बियाणांची मागणीही लवकरच केली जाईल.
- डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT