Poultry Industry Agrowon
ताज्या बातम्या

Poultry Industry : कुक्कुट खरेदीदार कंपन्यांच्या वजनकाट्यांची होणार तपासणी

Poultry Farming : करारदार कंपन्या, व्यापारी शेतकऱ्यांकडून कुक्‍कुट पक्ष्यांची उचल करतात. मात्र त्या दरम्यान वजनात तफावत येत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.

Team Agrowon

Nagpur News : करारदार कंपन्या, व्यापारी शेतकऱ्यांकडून कुक्‍कुट पक्ष्यांची उचल करतात. मात्र त्या दरम्यान वजनात तफावत येत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. त्या पार्श्‍वभूमीवर त्या त्या जिल्ह्यात वैद्य मापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देत वजनकाटे तपासून घेण्याचे निर्देश राज्यातील पशुसंवर्धन उपायुक्‍तांना देण्यात आले आहेत.

कुक्कुटपालन व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या मंगळवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत लिफ्टिंगदरम्यान पोल्ट्री व्यावसायिक आणि व्यापारी यांच्या वजनात तफावत येत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता.

त्यानुसार राज्यातील कुक्‍कुट विक्री व्यवसाय असणाऱ्या, तसेच फार्मवरून पक्षी नेणाऱ्या व्यापाऱ्यांकडील वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबत वैद्य मापनशास्त्र विभागाच्या नियंत्रकांना पशुसंवर्धन आयुक्‍त हेमंत वसेकर यांच्याव्दाद्वारे विनंती करण्यात आली होती. त्यानंतर आता पशुसंवर्धन आयुक्‍तांनी सर्व पशुसंवर्धन उपायुक्‍तांना व्यापाऱ्याच्या वजन

काट्यांबाबत वैद्य मापनशास्त्र अधिकाऱ्यांना माहिती देण्याबाबत कळविले आहे. त्यांच्याकडून वजन काटे तपासून घेण्याबाबत आवश्‍यक कार्यवाही करावी, असेही वसेकर यांनी कळविले आहे.

कुक्कुटपालन व्यवसायाच्या स्थळावरून पक्षी उचलताना वजनात तफावत आढळत असल्याचा मुद्दा आम्ही राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीच्या बैठकीत मांडला होता. त्याची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्‍तांनी वैद्य मापनशास्त्र विभागाकडून वजनकाटे तपासण्यासंबंधीचे निर्देश दिल आहेत. यातून निश्‍चितच कुक्कुटपालन व्यवसायिकांना दिलासा मिळेल.
- शरद गोडांबे, समन्वयक, पोल्ट्री योद्धा फेडरेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT