Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : उसासाठी माजलगाव धरणातून दोन दिवस मिळणार पाणी

Latest Agriculture News : पाणी सोडण्यासाठी थावरे बैलगाडी घेऊन शेतकऱ्यांसह सकाळी साडेअकरा वाजता धरणावर दाखल झाले.

Team Agrowon

Beed News : माजलगाव धरणातून उसासाठी एक पाळी जास्तीचे पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी शुक्रवारी (ता. २३) शेतकऱ्यांसह धरणात उडी मारण्याचा इशारा दिला होता.

पाणी सोडण्यासाठी थावरे बैलगाडी घेऊन शेतकऱ्यांसह सकाळी साडेअकरा वाजता धरणावर दाखल झाले. या वेळी धरण प्रशासनाने २६ व २७ जून असे दोन दिवस धरणातून जास्तीचे पाणी सोडण्याबाबत लेखी आश्‍वासन थावरे यांना दिले.

माजलगाव धरणातून शेतकऱ्यांच्या ऊस व इतर पिकांसाठी दरवर्षी रोटेशन प्रमाणे पाणी सोडले जाते. या वर्षीचे पाणी सोडण्याचे रोटेशन मे महिन्यात पूर्ण झाले होते. मात्र पाऊस नसल्याने ऊस जळून जात आहे.

यामुळे रोटेशन पूर्ण झाले असले, तरी एक पाळी पाणी उसासाठी सोडावे, अशी मागणी भाई थावरे यांनी केली होती. माजलगाव तालुक्यात तीन साखर कारखाने असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. इतर पिकांपेक्षा उसाला जास्त पाणी लागते.

सध्या धरणात २०.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिवंत पाणीसाठा ६४.६० दलघमी आहे. सध्या उपलब्ध पाणी वापरल्यावर २० दलघमी एवढा पाण्याचा वापर होईल. म्हणजे रोटेशन संपल्यानंतरही एक पाळी पाणी उसाला सोडल्यानंतरही धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहातो. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पाणी देण्याचे रोटेशन पूर्ण झाले, तरी पाऊस नसल्याने उसाला एक पाळी जास्त पाणी देण्यासाठी माजलगाव धरणातून जास्तीचे पाणी सोडावे या मागणीसाठी थावरे यांनी शेतकऱ्यांसह धरणात उडी मारण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, माजलगाव धरण केसापुरी वसाहत शाखाधिकारी डब्ल्यू. एम. शेख यांनी माजलगाव धरणातून पाणी सोडण्याविषयीचे निवेदन तहसील कार्यालयास दिले असून, कार्यकारी अभियंता यांच्यासोबत फोनवर चर्चा करण्यात आली.

त्यांनी २६ व २७ जून असे दोन दिवस माजलगाव धरणातून उसासाठी जास्तीचे पाणी सोडण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचे लेखी भाई थावरे यांना कळविले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला जीवदान मिळणार असून, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पत्र मिळाल्यानंतर भाई थावरे यांनीही धरण प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT