Jal Jeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jeevan Mission : मराठवाड्यात २२ लाख १५ हजार कुटुंबांना नळजोडणी

Water Supply Scheme : छत्रपती संभाजीनगर विभागात 29 लाख 73 हजार 215 कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणीद्वारे प्रति माणसी प्रति दिन 55 लिटर प्रमाणे शुद्ध व गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याबाबत निश्‍चित केले आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मराठवाडा विभागातील कामांचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर विभागात 29 लाख 73 हजार 215 कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणीद्वारे प्रति माणसी प्रति दिन 55 लिटर प्रमाणे शुद्ध व गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याबाबत निश्‍चित केले आहे. त्यांपैकी 22 लाख 15 हजार 994 कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा गुरुवारी (ता. 10) आढावा घेतला. या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सहायक उपमुख्य अभियंता एम. बी. पतंगे, उपअभियंता अजय जगताप, विकास शाखेचे उपायुक्त सुरेश वेदमुथा, सहायक आयुक्त राजेंद्र अहिरे यांच्यासह विभागातील आठही जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता, तांत्रिक सल्लागार उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राजेअर्दड म्हणाले, की विभागातील ज्या जिल्ह्यात कामाची गती कमी आहे, त्या जिल्ह्यांनी कामाबाबतचे नियोजन करून इतर जिल्ह्यांप्रमाणे काम गतीने पूर्ण करावे. लातूर जिल्ह्याने चांगले नियोजन केले असल्याचा उल्लेख करून विभागातील इतर जिल्ह्यांतील यंत्रणेने याबाबत माहिती घेऊन आपल्या जिल्ह्यातही कामाला गती द्यावी. जलजीवन मिशन अंतर्गत योजनेच्या कामात येणाऱ्या विविध तक्रारीमध्ये शासनाने नेमून दिलेल्या तांत्रिक सल्लागार संस्थांनी कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासावी.

तांत्रिक सल्लागारांचा याबाबतचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जलजीवन मिशन योजनेच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी महिन्यातून किमान एक बैठक तसेच संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिन्यातून किमान दोन बैठका घेण्याबाबतही विभागीय आयुक्त श्री. राजेअर्दड यांनी यंत्रणेला सूचना दिल्या.

छत्रपती संभाजीनगर विभागात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सर्व योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीत विभागातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT