Water Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यांत पाणीटंचाईचे सावट

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांत मुबलक जलसाठा आहे. असे असतानाही काही भागांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

यवतमाळ : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांत मुबलक जलसाठा आहे. असे असतानाही काही भागांत पाणीटंचाई (Water Shortage) भासण्याची शक्यता आहे.

यासाठी संभाव्य पाणीटंचाई (Water Scarcity) कृती आराखडा तयार करण्यात केला जाणार आहे. यात विहीर अधिग्रहण, टँकर यांसह विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या असून, पुसद, उमरखेड, महागाव व घाटंजी या चार तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. असे असतानाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. गेल्या वर्षी पाचशेच्या वर गावांत टंचाईच्या दृष्टीने विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. यासाठी जवळपास आठ कोटी रुपयांच्या संभाव्य टंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती.

टंचाई आराखड्यातून विंधन विहीर कार्यक्रम, तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, खासगी विहीर अधिग्रहण, टँकर आदी उपाययोजना करण्यात आल्या. यंदा जिल्ह्यात सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला. सर्वत्र ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

उमरखेड, पुसद, महागाव भागात टंचाई कायमच

जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, महागाव या माळपठार भागात कायमच टंचाई डोके वर काढते. याशिवाय घाटंजी तालुक्यातील काही भागात टंचाई दिसतेच. जिल्ह्यातील काही भाग ‘ड्राय’झोन असल्याने टंचाई डोके वर काढतेच. या भागातील नागरिकांना टंचाईचे चटके बसू नये, यासाठी उपाय योजना करतात. यंदाही याच भागातील गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT