Water Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : विहिरींनी गाठला तळ

प्रतिवर्षी मोखाड्यात फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईला सुरुवात होते; मात्र यावर्षी दीड महिना अगोदरच जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Mokhada News : प्रतिवर्षी मोखाड्यात फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईला (Water Shortage) सुरुवात होते; मात्र यावर्षी दीड महिना अगोदरच जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईला (Water Scarity) सुरुवात झाली आहे.

१० जानेवारीला मोखाड्यात पहिला टॅंकर पाणीपुरवठ्यासाठी (Tanker Water) दाखल झाला आहे. सद्यस्थितीत तीन टॅंकरद्वारे सहा गावपाड्यांना पाणीपुरवठा (Water Supply) सुरू केला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या वाढणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

दर वर्षी मोखाड्यात फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईला सुरुवात होते. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला पहिला टॅंकर पाणीपुरवठ्यासाठी मोखाड्यात दाखल झाला होता. या वर्षी दीड महिना अगोदरच म्हणजे १० जानेवारीला शासनाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे.

मोखाड्यातील अतिदुर्गम पाणीटंचाईला संवेदनशील असलेल्या दापटी एक आणि दापटी दोन या दोन गावपाड्यांना पहिल्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर टंचाईग्रस्त गाव पाड्यांमध्ये वाढ झाली.

त्यामध्ये हेदवाडी, ठवळपाडा, हट्टीपाडा, स्वामीनगर या गावपाड्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. त्यामुळे आता तालुक्यात एकूण सहा टंचाईग्रस्त गाव पाड्यांना आता तीन टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे

अन्य पाड्यांत टॅंकर मंजुरीसाठी प्रस्ताव

गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी उन्हाची तीव्रता जास्त असणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मोखाड्यात ही टंचाईग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढत आहे.

तालुक्यातील मडक्याची मेट, गवरचरीपाडा, भोवाडी या गावपाड्यांतील विहिरींनी तळ गाठल्याने, तेथील नागरिकांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी मागणी पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवल्याची माहिती तालुका पंचायत समिती प्रशासनाने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Leaf Blight: भातावरील करप्याचे कारण ओळखूनच उपाय करा

Crop Damage: पाऊस पडला तरी पिकांचे नुकसान भरून येणार नाही

Crop Loan Burden : कर्जाआधीच शेतकऱ्यांच्या खिशाला झटका!

Automated Weather Stations: आजऱ्यात हवामान केंद्रांसाठी ६५ ग्रामपंचायतींची सहमती

Maize Threshing: बागायती मका पीक मळणीवर

SCROLL FOR NEXT