Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation : रब्बी सिंचनाकरिता काटेपूर्णातून पाणी सोडले

काटेपूर्णा प्रकल्पावरील सर्व पाणी वापर संस्थांनी रब्बी हंगामासाठी पाण्याची मागणी केल्यानंतर प्रकल्पावरील पाणीवापर संस्थांना पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये बोरगाव मंजू येथे घेण्यात आला होता.

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून (Katepurna Project) यंदाच्या रब्बी हंगामासाठी (Rabi Season) पाणी (Irrigation) सोडण्यात आले. खांबोरा येथील उन्नई बंधाऱ्यावरून प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे, उपविभागीय अभियंता विशाल कुलकर्णी, कार्याध्यक्ष दिगांबर गावंडे व पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष व संचालकाची या वेळी उपस्थिती होती.

काटेपूर्णा प्रकल्पावरील सर्व पाणी वापर संस्थांनी रब्बी हंगामासाठी पाण्याची मागणी केल्यानंतर प्रकल्पावरील पाणीवापर संस्थांना पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये बोरगाव मंजू येथे घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करीत उन्नई खांबोरा येथील बांधऱ्यावरून बंधाऱ्याच्या गेटचे पूजन करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले.

या वेळी मनोज तायडे यांनी पाणी व्यवस्थापनाची बाजू राखण्यासाठी प्रकल्पावर पाणी वापर संस्थेच्या देखभाल दुरुस्तीची कामे पाहिजे त्याप्रमाणात न झाल्यामुळे पाणी व्यवस्थापनाला अडचण जाऊ नये यासाठी ठिकठिकाणी कामे करणे गरजेचे होती.

पण सरकारने जलसंपदा विभागाला देखभाल दुरुस्तीचा निधी दिला नाही, त्यामुळे प्रकल्पावर पाणी वापर संस्थेच्या कालवानिहाय कामे करता आले नाही, असे सांगितले. टेल-टू-हेड हे सिंचनाचे सूत्र प्रकल्पावर राबवणे कठीण जाईल.

या कार्यक्रमाला शाखा अभियंता श्री. परिहार, चंडिका पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सुभाष देशमुख, भुजंगराव गावंडे, डॉ. शर्मा, आशिष देशमुख, एस. टी. नायडेकर व पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT