Irrigation Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Takari Irrigation : ‘ताकारी’चे पाणी पोहोचले तासगाव तालुक्यात

Agriculture Irrigation : हे पाणी मागणीनुसार मुख्य कालव्याच्या शेवटी १४४ किलोमीटरवर सोनी (भोसे) या मिरज तालुक्यातील गावांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

Team Agrowon

Sangli News : टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी ताकारी उपसा योजनेचे यंदा पावसाळ्यात सुरू झालेले पाणी आवर्तन कडेगाव व खानापूर तालुक्यातील लाभक्षेत्राची तहान भागवून सध्या तासगाव तालुक्यातील मुख्य कालव्याच्या १०५ किलोमीटरवर वंजारवाडीजवळून वाहत आहे.

हे पाणी मागणीनुसार मुख्य कालव्याच्या शेवटी १४४ किलोमीटरवर सोनी (भोसे) या मिरज तालुक्यातील गावांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

‘ताकारी’चे हे पाणी २३ जुलैला सुरू झाले असून, बारमाही पिकांसह उन्हाळी शेतीला या पाण्याचा फायदा होत आहे. सुरुवातीचे दहा दिवस कडेगाव तालुक्यातील सिंचन क्षेत्राला पाणी दिल्यानंतर पाण्याने खानापूर तालुक्याचीही तहान भागविली व आता वंजारवाडीजवळून वाहत आहे. या पाण्याने ऐन पावसाळ्यात पिण्यासाठी व लाभक्षेत्रातील पिकांना चांगलाच दिलासा दिला आहे.

दरम्यान, लांब पल्ल्यावर गेल्यावर मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब भरपूर राहावा, यासाठी टप्पा १ आणि २ वरील प्रत्येकी १० पंप सुरू करण्यात आले आहेत. शिवाय टप्पा ३ वरील २ व टप्पा ४ वरील २ पंपांचे पाणी सोनहिरा खोऱ्यातील सिंचनक्षेत्रासाठी सोडण्यात आले आहे. ते पुढे तडसर भागातही जात असते.

या पाण्याचा लाभ बारमाही बागायती शेतीसह कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यातील बऱ्याच गावांच्या पाणीपुरवठा योजनांना होतो. या वर्षी पावसाने या भागाला आजतागायत दिलेल्या हुलकावणीमुळे सर्वत्र जमिनीतील पातळी खालावून पाणीप्रश्‍न बिकट झाला होता. परिणामी, शेतीला पाणी कमी पडून अंशतः पिके करपली होती. मात्र ताकारी सुरू झाल्याने सध्यातरी मुबलक पाणी झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT