Water Stock  Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यांत पाणीपातळी अर्धा मीटरने घटली

Water Stock : अतितापमानाने जिल्ह्यातील विहिरींच्या पाणीपातळीत घट होत आहे. मे महिन्यात तापमान ४० ते ४७ अंशांदरम्यान होते.

Team Agrowon

Jalgaon News : अतितापमानाने जिल्ह्यातील विहिरींच्या पाणीपातळीत घट होत आहे. मे महिन्यात तापमान ४० ते ४७ अंशांदरम्यान होते. यामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पाणी पातळीत अर्धा मीटरने घट झाल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून देण्यात आली. आगामी १५ दिवसांत पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील बोदवड, यावल, भुसावळ आणि जामनेर तालुक्यांतील भूजल पातळीत ०.३५ मीटरने घट झाली असून, इतर तालुक्यांत पाण्याची पातळी समाधानकारक आहे. मे महिन्यात तापमानाचा पारा ४५ ते ४७ अंशांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली आहे.

दुसरीकडे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. भूगर्भातील पाणीसाठा नेमका किती कमी झाला, याची नोंद वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून घेतली जाते. साधारणत: तीन टप्प्यांत ही नोंद घेण्याचे काम होते. मे महिन्यात घेतली जाणारी नोंद जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या नोंदीनुसारच प्रशासकीय स्तरावर पाण्याचे नियोजन केले जाते.

१७८ विहिरींचे निरीक्षण...

भूजल पातळीची नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील १७८ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील ११, रावेर १०, भुसावळ ७, बोदवड ६, यावल ७, जामनेर २४, जळगाव १५, धरणगाव ७, एरंडोल ४, चोपडा १४, अमळनेर १४, पारोळा १६, पाचोरा १४, भडगाव ८ आणि चाळीसगाव तालुक्यातील २१, अशा एकूण १७८ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर भूजल पातळी निश्‍चित करण्यात आली. वाढ झालेल्या निरीक्षण विहिरींची संख्या १४४ असून, ३४ निरीक्षण विहिरींमध्ये घट दर्शविली आहे.

विहिरींच्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यांची भूजल पातळी निश्‍चित केली आहे. ती अशी...

तालुका पाणीपातळी वाढ/घट

भुसावळ ०.८१ (घट)

बोदवड ०.०१ (घट)

यावल ०.४३ (घट)

जामनेर ०.१६ (घट)

मुक्ताईनगर ०.१३ (वाढ)

रावेर ०.२८

जळगाव ०.५८

धरणगाव ०.९१

एरंडोल ०.९७

चोपडा ०.६९

अमळनेर ०.७३

पारोळा ०.३५

पाचोरा ०.८५

भडगाव ०.६५

चाळीसगाव ०.४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT