Heavy Rains Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : दक्षिण कोकणात मुसळधारेचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगांची दाटी कायम असून, उर्वरित राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी राज्यात ऊन सावल्यासह पावसाच्या सरी येत आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे : कोकणात सुरू असलेल्या पावसाचा जोर (Rain Force in Konkan) पुन्हा वाढणार आहे. आज (ता. २८) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) देण्यात आला आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain Prediction) आहे. उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगांची दाटी कायम असून, उर्वरित राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी राज्यात ऊन सावल्यासह पावसाच्या सरी येत आहेत. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. आज (ता. २९) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह विदर्भातील बुलडाणा, अकोला, वशीम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

कमी दाब क्षेत्र निवळले

उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत असलेले अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र निवळले. या भागात समुद्र सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेल्या कमी दाब पट्टा सक्रिय आहे. दक्षिण भारतात परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. राजस्थान पासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

मॉन्सूनची प्रगती शक्य

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) अरबी समुद्रावरील शाखेने सोमवारी (ता. २७) गुजरात राज्यात प्रगती केली आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील आज (ता. २९) बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर राज्याच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवसात देशाच्या बहुतांशी भागात मॉन्सून पोचण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT