Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : मजुरी वाढली अन् बियाणे महागले

Seed Market : नैसर्गिक आपत्ती, वाढलेले मजुरीचे दर, महागलेले बियाणे, खते आणि वाढते इंधनाचे दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Team Agrowon

Vasi News : नैसर्गिक आपत्ती, वाढलेले मजुरीचे दर, महागलेले बियाणे, खते आणि वाढते इंधनाचे दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पालघर जिल्ह्यात ७६ हजार हेक्टरवर भातशेती केली जाते. मात्र, भरमसाट वाढलेला उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, विक्रमगड, डहाणू, जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी भागांत हजारो हेक्टर क्षेत्र भातशेती लागवडीखाली आहे. काही वर्षांपासून शेती व बागायतीवर नैसर्गिक संकट घोंगावत आहे.

गतवर्षी अवकाळी पावसामुळे पाच तालुक्यांत ५,२८६.५८ हेक्टर शेतजमीन बाधित झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. यंदा पावसाची जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे अनेक भागांत उशिराने पेरणी करण्यात आली.

खते

युरिया २७० रुपये (४५ किलो)

सुफला १४७० (५० किलो)

मजुरी ४०० ते ५००

टॅक्टर तासाला ६०० रुपये

बियाणे

वायएसआर १० किलो ८५०

रुपाली १२ किलो १०२०

मजुरांची कमतरता, ट्रॅक्टरही महागला

भातशेतीसाठी लागणाऱ्या मजुरांचीही कमतरता भासत आहे. त्यामुळे मजुरीचे दरही गगनाला भिडले आहेत. रोज ४०० ते ५०० रुपये मजुरी, जेवण व दोन वेळा चहा असा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे; तर ट्रॅक्टरसाठी गेल्या वर्षीच्या ५०० रुपयांच्या तुलनेत प्रतितास १०० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढला आहे.

मजुरांना गवंडी व महापालिकेत अधिक मजुरी मिळते. त्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजूर मिळाले तर त्यांना भरमसाठ मजुरी मोजावी लागते. भरमसाट वाढलेला उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे काही वेळेस कुटुंबातील सदस्यच शेतीची कामे करतात.
- सुभाष भट्टे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT