Milk Union Elections Agrowon
ताज्या बातम्या

Jalgaon Milk Association : दूध संघ निवडणुकीत नियमांची पायमल्ली

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी राजकीय दबावाचा वापर करून नियमांची मोडतोड करीत आहेत.

Team Agrowon

जळगाव : ‘‘जळगाव जिल्हा दूध उत्पादक (Jalgaon Milk Association Elections) संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी राजकीय दबावाचा वापर करून नियमांची मोडतोड करीत आहेत. तालुका मतदारसंघाच्या यादीत असलेल्या उमेदवाराला त्याच तालुक्यात उमेदवारी करण्याचा नियम होता.

मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांत नियम बदलून कोणत्याही तालुक्यातील मतदाराला कोणत्याही तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नियम अमलात आणून आमदार मंगेश चव्हाण यांचा मुक्ताईनगर तालुक्यातून अर्ज दाखल केला आहे,’’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच केला.

जळगाव येथील मुक्ताई निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे उपस्थित होत्या. खडसे म्हणाले, ‘‘जिल्हा दूध संघ आपल्या नेतृत्वाखाली ऊर्जितावस्थेत आला आहे.

त्यामुळे संघाचा संचालक होण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली. राज्याचे मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनाही संचालक होण्याचा मोह झाला आहे. त्यामुळे त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.’’

आमदार चव्हाणांच्या अर्जावर हरकत

आमदार खडसे म्हणाले, ‘‘अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या १५ मिनिटांत नियम बदलून कोणत्याही तालुक्यातील उमेदवाराला कोणत्याही तालुक्याच्या मतदारसंघात निवडणूक लढता येईल, असा नियम करण्यात आला.’’ दरम्यान अर्ज छाननीत हरकती प्राप्त झाल्या आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT