VAnashree Award Agrowon
ताज्या बातम्या

'Vanashree' Award : गाडेकर, घोडके यांना ‘वनश्री’ पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे देण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

Team Agrowon


नगर : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे देण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार ('Vanashree' Award) घोषित करण्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यातील पिंपळनेर (ता. पारनेर) येथील चंदन उत्पादक शेतकरी राजेंद्र गाडेकर, कोपरगावचे सुशांत घोडके यांच्यासह पुणतांबा (ता. राहाता), लोहसर (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे देण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. या पुरस्कारात २०१८ च्या राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये नाशिक विभागात राजेंद्र गाडेकर (पिंपळनेर, नगर) यांना प्रथम, ग्रामपंचायतीच्या राज्यस्तरावर पुणतांबा (ता. राहाता) ग्रामपंचायतीला द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. २०१९ च्या पुरस्कारात कोपरगाव येथील सुशांत घोडके यांना राज्यस्तरावर द्वितीय पुरस्कार तसेच नाशिक विभाग स्तरावरही प्रथम जाहीर झाला.

लोहसर (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीला राज्यस्तरावर ग्रामपंचायत विभागातून तृतीय व नाशिक विभागात प्रथम, सेवाभावी संस्था संवर्गातील नाशिक विभागात सोनई (ता. नेवासा) येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानला प्रथम व नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठानला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. राजेंद्र गाडेकर चंदन उत्पादक शेतकरी म्हणून परिचित आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT