Agricultural University Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural University : दैनंदिन आहारात ज्वारीच्या भाकरीचा वापर करा ः डॉ. ठाकरे

‘‘शेतकऱ्यांनी दैनंदिन आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा वापर करावा,’’ असे आवाहन डॉ. जी. व्ही. ठाकरे यांनी केले.

Team Agrowon

वाशीम ः ‘‘शेतकऱ्यांनी दैनंदिन आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा वापर करावा,’’ असे आवाहन डॉ. जी. व्ही. ठाकरे यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (Agricultural University) ज्वार संशोधन विभागाने विकसित केलेल्या ‘पीकेव्ही क्रांती’ या रब्बी (Rabi) ज्वारी वाणाचे पीक प्रात्यक्षिक शिरसाळा येथील १०० शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विज्ञान केंद्रातर्फे यंदा घेण्यात आले आहे.

या लागवड झालेल्या क्षेत्रात ‘पीकेव्ही क्रांती’च्या प्रात्यक्षिकाची प्रत्यक्ष पाहणीसाठी सोमवारी (ता.२८) रब्बी ज्वारी पीक व्यवस्थापन या विषयावरील शेतकरी संवाद व पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. जगन्नाथ इंगोले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्वार संशोधन विभागातील शास्त्रज्ञ डॉ. जी. व्ही. ठाकरे उपस्थित होते. ‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, शास्त्रज्ञ डॉ. एस. के. देशमुख, डॉ. डी. एन. इंगोले व कृषी सहायक गजानन इढोळे उपस्थित होते.

डॉ. जगन्नाथ इंगोले यांनी आधुनिक पद्धतीने व व्यावसायिक शेतीसाठी शेतकऱ्यांचे गट संघटन अधिक कार्यक्षम करणार असल्याचे सांगितले. डॉ. काळे यांनी दत्तक गावामध्ये इतर विभागाची सांगड घालून आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. दत्तराव इंगोले, नारायण इंगोले, रामकृष्ण इंगोले, भगवान इंगोले, किसन इंगोले यांच्या शेतातील ज्वारी प्रात्यक्षिकाची पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT