Potkharaba Land Agrowon
ताज्या बातम्या

Potkharaba Land : पोटखराब क्षेत्राचे प्रस्ताव तातडीने मागविले

जळगाव तालुक्यातील फुपनगरी, कानळदा येथील पोटखराब क्षेत्राचे प्रस्ताव मार्गी लागण्यास झालेली दिरंगाई, संबंधित शेतकऱ्यांची यादी गहाळ झाल्याप्रकरणी जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः जळगाव तालुक्यातील फुपनगरी, कानळदा येथील पोटखराब क्षेत्राचे (Pokharaba Land) प्रस्ताव मार्गी लागण्यास झालेली दिरंगाई, संबंधित शेतकऱ्यांची यादी (Farmers List) गहाळ झाल्याप्रकरणी जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याबाबत संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कानळदा येथील तलाठी ज्ञानेश्‍वर माळी यांना प्रांत कार्यालयात बोलावून घेण्यात आले होते. तसेच प्रांत कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना देखील विचारणा करण्यात आली.

प्रस्ताव आले होते का, आले होते तर ते मंजूर कसे झाले नाहीत किंवा फक्त संबंधित शेतकऱ्यांची कच्ची यादी सादर झाली, याबाबत सोक्षमोक्ष करण्यात आला. यानंतर संबंधितांना सूचना देण्यात आल्या. पोटखराब क्षेत्राचे प्रस्ताव मार्गी लावण्यासंबंधी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

‘कुणीही कुचराई करू नये’

जळगाव प्रांत कार्यालयांतर्गत जामनेर, जळगाव या भागांतील पोटखराब क्षेत्राचे किती प्रस्ताव मार्गी लागले, किती प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले व किती प्रस्ताव आले, याची माहिती घेण्यात आली.

ती जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठांना देखील देण्यात आली. या मोहिमेत कुणीही कुचराई करू नये, सर्वांनी शेतकऱ्यांना याबाबत सहकार्य करावे, अशा सूचना तहसीलदार कार्यालय, भूमी अभिलेख विभागासह प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी दिल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT