Urea Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Urea Shortage : वऱ्हाडात रब्बीत युरियाची चणचण

या भागात रब्बी हंगामातील पिकांना युरियाची गरज असताना अनेक ठिकाणी हे खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः या भागात रब्बी हंगामातील पिकांना युरियाची (Urea) गरज असताना अनेक ठिकाणी हे खत (Fertilizer) उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातही काही ठिकाणी युरिया (Urea Shortage) उपलब्ध असेल तर वाढीव दराने त्याची सर्रास विक्री केल्या जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

रब्बी हंगामात गव्हाच्या पिकाला प्रामुख्याने युरियाची मात्रा देण्याची वेळ असतानाच या खताचा तुटवडा भासत आहे. प्रशासनाच्या आकडेवारी युरिया उपलब्ध असल्याचे दिसून येते. परंतु प्रत्यक्षात ग्रामीण भागात युरियाची टंचाई निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना युरियाच्या बॅग मिळवताना एक तर लिकिंगला सामोरे जावे लागते किंवा अधिकचा दर द्यावा लागत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात युरियाची चणचण अधिक आहे. काही शेतकरी हरभऱ्यालाही युरियाची मात्रा देत असतात. वास्तविक युरिया हरभऱ्याला देऊ नये, असे तज्ज्ञांकडून वारंवार स्पष्ट केले आहे. प्रामुख्याने गव्हाच्या पिकाला युरियाची नितांत गरज होती.

शासनाने वाशीम जिल्ह्यात सर्वच ठिकाणी युरिया उपलब्ध करून दिला. पण तो उपलब्ध करून देताना उशीर झाला. यामुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यात या विभागात सर्वांत जास्त गव्हाची पेरणी केली जाते. यंत्रणांकडून युरियाची उपलब्धता वेळेवर करणे आवश्‍यक होते. मात्र, गव्हाला युरिया वेळेवर न मिळाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे पीक पिवळे पडले. वाढही खुंटलेली दिसून येत आहे, असे एका शेतकऱ्याने सांगितले.

अकोला जिल्ह्यातही युरियाच्या उपलब्धतेबाबत तसेच प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळण्याबाबत अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. युरिया सहजपणे उपलब्ध होत नसल्याने त्रास होत आहे. या विभागातील तीन जिल्ह्यात सुमारे ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड पूर्ण होत आलेली आहे. अद्यापही काही शेतकरी कपाशीचे पीक काढून गव्हाच्या लागवडीसाठी तयारी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT