Sugarcane Management Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Management : कुरणेवाडीत ऊस खोडवा, पाचट व्यवस्थापनावर कार्यशाळा

कृषी विभागाच्या वतीने बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी तानाजी पवार यांच्या प्रक्षेत्रावर ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Team Agrowon

बारामती : कृषी विभागाच्या (Department of Agriculture) वतीने बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी (Farmer) तानाजी पवार यांच्या प्रक्षेत्रावर ऊस (Sugarcane Management) खोडवा व पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी पाचट कुजविण्याचे फायदे तसेच खर्चात बचत करून उत्पन्नवाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पाचट जाळल्यामुळे जमिनीतील जैविक घटकांचा व अन्नद्रव्यांचा नाश होतो. उसाच्या पाचटात ०.५० टक्का नत्र, ०.२० टक्का स्फुरद, १ टक्का पालाश आणि ४० टक्के सेंद्रिय कर्ब असतो. उसाचे पाचट जाळल्यामुळे पर्यावरण प्रदूषण होऊन आजारांचे प्रमाण वाढते, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

कृषी विभागाच्या महाडीबीटीअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, कांदाचाळ, ठिबक सिंचन, रब्बी पीकविमा, महात्मा गांधी रोजगार हमी फळबाग लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादी योजनांची श्री. तांबे यांनी माहिती देऊन उसाचे पाचट कुजवण्याविषयी शेतकऱ्यांना आवाहन केले.

मंडळ कृषी अधिकारी हिंदुराव मोरे यांनी प्रत्यक्ष प्लॉटवर बुडके छाटणे, पाचट योग्य पद्धतीने पसरविणे, रासायनिक खते व जिवाणू खते देण्याची पद्धत याबाबत प्रात्याक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी कृषी पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड, जिव्हाळा शेतकरी बचत गटाचे सदस्य, तानाजी पवार, लक्ष्मण भोजने, शेतकरी आदी उपस्थित होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT