Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत अवकाळी पावसाची हजेरी

हवामान विभागाने दिलेला अवकाळी पावसाचा इशारा खरा ठरला. बुधवारी (ता.१४) रात्री अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. प्रामुख्याने अकोला, बुलडाणा, चिखली, मलकापूर, साखरखेर्डा या भागात पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

अकोला ः हवामान विभागाने (Weather Department) दिलेला अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा खरा ठरला. बुधवारी (ता.१४) रात्री अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. प्रामुख्याने अकोला, बुलडाणा, चिखली, मलकापूर, साखरखेर्डा या भागात पावसाने हजेरी लावली.

या अवकाळी पावसाचा गहू आणि हरभरा या पिकांना काहीसा फायदा होईल. तर तुरीच्या पिकावर किड-रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. तुरीच्या शेंगामध्ये अळीचा हल्ला वाढू शकतो. तर घाटे अवस्थेत असलेल्या हरभरा पिकालाही या वातावरणामुळे नुकसान संभव्यते.

अकोल्यात रात्री सरी आल्याने थंडी पूर्णतः गायब झाली. खामगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान जवळपास १ ते दीड तास रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. काळेगाव भागात जोरदार पावसाने नाल्याला पूरही आला. मलकापूर तालुक्यातही हलक्या स्वरूपात पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या पावसामुळे मलकापुरातील बाजारपेठेत चांगलीच धांदल उडाली होती.

सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

गेल्या आठवडाभरापासून या भागात वातावरणात बदल झाले आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले. सतत ढगाळ वातावरण बनलेले राहते. यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार बळावत चालले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uran Water: उरणकरला दूषित पाण्याचा धोका

Raigad Dams: जलसाठ्याने जिल्ह्याला दिलासा

Loan Approvals in Jalna: जालना जिल्ह्यात ९२ कर्ज प्रस्तावांना बँकांची मंजुरी

Krushi Swavalamban Yojana: कृषी स्वावलंबनसाठी ऑनलाइन अर्ज करा

Maharashtra Bandh: दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद, 'वंचित'कडून 'महाराष्ट्र बंद', कार्यकर्ते रस्त्यावर उतरले

SCROLL FOR NEXT