Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Unseasonal Rain : वादळी पाऊस, गारपिटीचा रब्बी पिके, फळबागांना तडाखा

ऐन सुगीत तोंडचा घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Team Agrowon

Parbhani News परभणी-हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडलांत रविवारी (ता. १९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या दोन जिल्ह्यांतील विविध भागात सलग तीन चार दिवसांतील वादळी वारे, अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट यामुळे रब्बी पिके, फळपिके, भाजीपाला पिकांना मोठा तडाखा (Crop Damage) बसला आहे.

पाऊस, गारपीट थांबत नसल्यामुळे पीकहानीच्या क्षेत्रात दिवसागणिक भर पडली आहे. ऐन सुगीत तोंडचा घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शनिवारी (ता. १८) दुपारी तीननंतर आणि रात्री परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलांत तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, हिंगोली, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

वादळी वारे, गारपिटीमुळे ज्वारी, गव्हाची उभी पिके आडवी झाली. ज्वारीचा कडबा, हरभरा, हळद भिजली आहे. केळी, संत्रा, मोसंबी, चिकू आदी फळबागांचे नुकसान झाले. कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

या दोन जिल्ह्यांत उशिरा पेरणी केलेली ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांची सुगी सुरु आहे. अनेक गावांत सुगीसाठी मजुरांची समस्या आहे.

त्यात सततच्या पावसामुळे सुगीच्या कामात अडथळे येत आहेत.गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेतील उभ्या तसेच शेतात कापणी करून ठेवलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकांची नासाडी झाली आहे. खरबूज, टरबूज, टोमॅटो, फ्लॉवर, दोडके, कारले यासह पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात शुक्रवारी (ता. १७) झालेल्या गारपीटग्रस्त पिकांची पाहणी शनिवारी (ता. १८) जिल्हाधिकारी आंचल गोयल, खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली. या वेळी बाधित शेतकऱ्यांनी तत्काळ मदत देण्याची मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Farmer Death: पीक गेलं, कर्ज वाढलं, मुलीच्या शिक्षणाचा खर्चही पेलवेना; नांदेडमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

Annapurti Grain ATM : आता रेशनसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही; नाशिकमध्ये 'अन्नपूर्ती धान्य एटीएम'ची डिजिटल क्रांती

Farmer Welfare Portal: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे नवे संकेतस्थळ सुरू! सरकारी योजना, अनुदान आणि शेतीची माहिती आता एका क्लिकवर; पाहूयात नव्या संकेतस्थळाची माहिती!

India-New Zealand FTA: भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार लागू, याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?

Drought Farming: कमी पाण्यात कोणती आंतरपिके फायदेशीर? ज्वारी, करडई आणि हरभऱ्याचे नियोजन

SCROLL FOR NEXT