Rabi season Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Season : रब्बी हंगामात विद्यापीठाचे बियाणे उपलब्ध होणार.

यंदाच्या रब्बी हंगामातील बियाणे विक्रीचा प्रारंभ कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे. ज्वारीचे २०० क्विंटल, करडईचे ३०० क्विंटल उपलब्ध आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात (Rabi Season) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात उत्पादित विविध पिकांचे मिळून सुमारे २ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी शनिवारी (ता. १७) यंदाच्या रब्बी हंगामातील बियाणे विक्रीचा प्रारंभ कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या हस्ते होणार आहे.

ज्वारीचे २०० क्विंटल, करडईचे ३०० क्विंटल उपलब्ध आहे. उगवण चाचण्यांच्या अहवालानंतर हरभऱ्याचे बियाणे टप्प्याटप्प्याने उपलब्ध होईल. विविध पिकांचे मिळून सुमारे २ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सूत्रांनी सांगितले.या वाणांचे बियाणे होणार उपलब्ध...

यंदा हरभऱ्याच्या फुले विक्रम, बीडीएनके ७९८ या वाणांचे ज्वारीच्या परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती या वाणांचे, करडईच्या पूर्णा, पीबीएनस १२ या वाणांचे, गव्हाच्या समाधान या वाणांचे तरजवसाच्या लातूर ९३ वाणांचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT