Raju Shetty Agrowon
ताज्या बातम्या

Sugar : कारखान्यांच्या गोदामांवर छापे टाका, बेहिशोबी साखर कळेल

राज्यातील साखर कारखानदारांकडून सर्रास काटामारी होते. एका वाहनामागे सुमारे दोन ते अडीच टनाची काटामारी हमखास होते.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः राज्यातील साखर कारखानदारांकडून (Sugar Industrialist) सर्रास काटामारी होते. एका वाहनामागे सुमारे दोन ते अडीच टनाची काटामारी हमखास होते. किमान ३१०० रुपयांचा ऊसदर गृहित धरल्यास या काटामारीतून कारखानदार वर्षाकाठी सुमारे ४५८१ कोटी रुपयांचा दरोडा टाकतात, यात शेतकऱ्यांची लूट तर होतेच, पण विनापावती साखरेची विक्री करून सरकारच्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या जीएसटीलाही चुना लावतात. (Sugar)

तेव्हा शासनाने साखर कारखान्यांच्या गोदामावर अचानक छापे टाकावेत आणि बेहिशोबी साखर किती आहे, हे तपासावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता. १२) येथे पत्रकारांशी बोलताना केली. श्री. शेट्टी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, की कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत एफआरपी द्यावी लागते. पण बहुतांश कारखानदार ती थकवतात. सरकारही त्याबाबत गांभीर्याने लक्ष देत नाही. या प्रश्नावर आम्ही आंदोलन करतो, आरआरसी कारवाईपर्यत निर्णयही होतो, पण कारखानदारांच्या दबावापुढे प्रशासन हतबल होते. कारखान्यांचे काटे ऑनलाइन करा, ही मागणी आहे. साखर कारखान्याचे २०० काटे ऑनलाइन करणे, फार अवघड नाही. पण सरकारची इच्छाच नाही.

ईडीचा वापर इकडेही करा...

शेतकऱ्यांची थकीत एफआरपी, साखरेची विक्री, सरकारचे धोरण यासारख्या विविध प्रश्नांवर शेट्टी यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने उत्तरे दिली. त्यावेळी बोलताना ईडीचा वापर केवळ राजकारणासाठी व्हायला नको, तर शेतकऱ्यांच्या अशा प्रश्नावरही पोलखोलीसाठी व्हावा, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Farming: विज्ञान सोयाबीन उत्पादनवाढीचे !

Rabi Crops: श्रीअन्नाची श्रीमंती

Maize Armyworm: ढगाळ हवामानात मक्यावरच्या लष्करी अळीचा धोका कसा रोखावा?

Land Acquisition Employment: प्रत्येक प्रकल्पग्रस्त जमीन हिस्सेदाराला नोकरीचा अधिकार

Ajit Pawar Tribute: ‘प्रशासनाचा वाघ म्हणजे अजितदादा’

SCROLL FOR NEXT