Turmeric Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Turmeric Crop Damage : वातावरण बदल, धुक्यामुळे हळद पिके सुकू लागले

हळद उत्पादनासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर भागात गेल्या काळातील वातावरण बदल, सततचे धुके पडल्याने हे पीक अचानक काही ठिकाणी वाळत असल्याचे दिसून आले आहे.

Team Agrowon

शिरपूर जैन, जि. वाशीम ः हळद उत्पादनासाठी (Turmeric Production) जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर भागात गेल्या काळातील वातावरण बदल (Climate Change), सततचे धुके (Fogg) पडल्याने हे पीक अचानक काही ठिकाणी वाळत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे हळद उत्पादनावर परिणाची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

हळदीचे पीक पूर्ण होण्यास जवळपास एक ते दीड महिना कालावधी शिल्लक असताना हळदीच्या पिकाची पाने वाळली आहेत. वेळेआधी वाळणाऱ्या पानांमुळे उत्पादनाला फटका बसू शकतो.

शिरपूर व परिसरात मसाला वर्गीय व नगदी पीक म्हणून मान्यता असलेले हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात हळदीची लागवड केली जाते.

यंदाचे पीक तयार व्हायला अजून एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. अशातच गेल्या काही दिवसांत वातावरणात झालेले बदल, सतत पडलेल्या धुक्यामुळे हळदीची पाने वाळून गेली.

आधीच अतिवृष्टीने सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर तुरीवर देखील बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊन तुरीचे पीकही पूर्ण होण्याआधीच वाळले. त्याचा उत्पादनावर थेट परिणाम दिसून आला. आता हळदीचेही असेच होते की काय अशी शंका निर्माण झाली.

थंडीची लाट अचानक आली आणि तापमान घटले तर वनस्पती वाळतात. जेथे सिंचन केलेले असेल तेथे हा परिणाम होत नाही. मात्र, पीक कोरडे असेल तर अशा प्रकारे पीक वाळू शकते. यावर तत्काळ कोणताही उपाय करणे शक्य राहत नाही. जेथे पीक हिरवे असेल त्या भागात आता सिंचन केले पाहिजे. तसेच बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.

- प्रा. डाॅ. विजय काळे, उद्यानविद्या विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT