Tur Crop Agrowon
ताज्या बातम्या

Tur Crop : खामखेड येथे तूर पिकाची शेतीशाळा

Farmer Training : बाळापूर तालुक्यातील मौजे खामखेड येथे या खरीप हंगामात लागवड होत असलेल्या तुरीच्या पिकाबाबत ‘आत्मा’तर्फे मार्गदर्शन करण्यात आले.

Team Agrowon

Akola News : बाळापूर तालुक्यातील मौजे खामखेड येथे या खरीप हंगामात लागवड होत असलेल्या तुरीच्या पिकाबाबत ‘आत्मा’तर्फे मार्गदर्शन करण्यात आले.

‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प उपसंचालक मिलिंद जंजाळ, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘खरीप तूर पीक लागवड’ या विषयावर शेतीशाळा आयोजित करण्यात आली.

सरपंच ज्योत्स्ना हागे, आत्मा तालुका तंत्र अधिकारी विजय शेगोकार, ‘पोकरा’चे प्रकल्प समन्वयक गोपाल बोंडे, कृषी सहायक गोपाल राऊत उपस्थित होते.

श्री. शेगोकार यांनी शेतकऱ्यांना सुधारित वाणांची निवड, वेळेवर पेरणी, बीजप्रक्रिया, रोपांची योग्य संख्या, रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर, योग्य आंतरपीक पद्धत, तूर पीक उत्पादन वाढीसाठी सुरुवातीपासून घ्यावयाची काळजी, या विषयी मार्गदर्शन केले.

बोंडे यांनी शून्य मशागत पद्धती, बियाणे खरेदी करताना घ्यायची काळजी आणि प्रकल्पाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. गोपाल राऊत यांनी पीकविमा योजना, महाडीबीटी, नैसर्गिक शेती आणि कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

शेतीशाळेसाठी कृषिमित्र सुरेश इंगळे, पोलिस पाटील संतोषराव हागे, उद्धवराव हागे, संतोष साबळे, गोपाल शेगोकार यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT