Gokul Milk Agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk : ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण सुरू

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे अखेर चाचणी लेखापरीक्षण सुरू झाले. दहा दिवसांत याचा अहवाल द्यावा लागणार आहे.

Team Agrowon

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे (Gokul Milk) अखेर चाचणी लेखापरीक्षण (Gokul Milk Audit) सुरू झाले. दहा दिवसांत याचा अहवाल द्यावा लागणार आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांत ही तपासणी पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय यांच्याकडील लेखापरीक्षण मंडळाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे चाचणी लेखापरीक्षण सुरू होत आहे. गोकुळच्या कारभारात अनागोंदी आहे.

लेखा परीक्षणात त्रुटी आहे. याच त्रुटींचे चाचणी लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी या मंडळाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर या संदर्भातील आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, गोकुळमध्ये लेखापरीक्षणाचे वाचन झाले. त्यावेळी सौ. महाडिक यांनी हे प्रश्‍न का उपस्थित केले नाहीत, असा उलट प्रश्‍न अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केला आहे. एकूणच या लेखा परीक्षणावरून गोकुळमधील राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे.

दरम्यान, चाचणी लेखापरीक्षणानंतर काय होणार यावरून शिंदे गट तसेच फडणवीस यांना मानणाऱ्या संचालकांमध्ये अस्वस्थता जाणवू लागली आहे.

गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण झाले पाहिजे, यासाठी ११ जानेवारीला सूचना दिल्या आहेत. दहा दिवसांत तपासणी करून याचा अहवाल देण्याचेही नमूद केले होते.

चाचणी लेखापरीक्षण सुरू झाल्यानंतर गोकुळमधील संबंधित विभाग कामाला लागला आहे. लेखापरीक्षण पूर्ण होईपर्यंत आणखी काही दिवस राजकीय चर्चेला उकळी मिळणार आहे. तर दुसरीकडे चाचणीनंतर गोकुळमधील नेमकी स्थिती समोर येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT