Environment Agrowon
ताज्या बातम्या

Environment Conservation : बदलापूरमध्ये दुर्मीळ झाडांचा खजिना

Rare Trees : राजकारणापाठोपाठ समाजकारणात एक यशस्वी महिला म्हणून नावलौकिक मिळवलेल्या दर्शना दामले यांनी आपल्या १० एकर शेतीत अनेक दुर्मीळ झाडांची लागवड केली आहे.

Team Agrowon

Badalapur News : राजकारणापाठोपाठ समाजकारणात एक यशस्वी महिला म्हणून नावलौकिक मिळवलेल्या दर्शना दामले यांनी आपल्या १० एकर शेतीत अनेक दुर्मीळ झाडांची लागवड केली आहे. सोबतच जवळपास ५० गायींचे संगोपनही त्या करतात. पर्यावरण समतोल राखायचा असेल, तर स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज असल्याचे मत त्या व्यक्त करतात.

बदलापूर पश्चिम बारवी डॅम रोडवरील जांभीळ घर येथे १० एकर जागेत दर्शना दामले यांचे घर व शेती आहे. त्यांनी बचत गटाची स्थापना करत गरजू व आधारहीन महिलांना स्वयंरोजगार देण्यासाठी विविध कौशल्य शिबिरे राबवली.

राजकारण व समाजकारणापलीकडे पर्यावरण व प्राणीप्रेमीही त्या आहेत. त्यांच्या १० एकर जागेत आंबा, फणस, काजू, जांभूळ या व्यतिरिक्त उंडी, शमी, बेल अनेक दुर्मीळ औषधी, मसाल्यांची, फळ आणि फुलांची झाडे लावलेली आहेत.

गरीब शेतकऱ्यांना गाईंचे दान

अनेक वर्षांपासून त्या विविध प्रजातींच्या जवळपास ५० गायींचे संगोपन करत आहेत. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी यातील काही गाई या परिसरातील गरीब शेतकऱ्यांना त्यांचे संगोपन नीट करण्याच्या वचनावर दान म्हणून दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT