Women Empowerment  Agrowon
ताज्या बातम्या

Women Empowerment : महिला विकास निधीतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण

पुणे येथील टर्निंग पॉइंट फाउंडेशन या संस्थेमार्फत प्रशिक्षण घेण्यात आले.

टीम ॲग्रोवन

पिरंगुट, ता. मुळशी ः मुठा ग्रामपंचायतीच्या (Mutha Grampanchayat) पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतील महिला विकास निधीतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले. पुणे येथील टर्निंग पॉइंट फाउंडेशन (Turning Point Foundation) या संस्थेमार्फत प्रशिक्षण घेण्यात आले.

या प्रशिक्षणात ब्युटीपार्लर, कापडी पिशव्या शिवणे, कँडल मेकिंग, कागदी पिशवी बनवणे तसेच अन्य विविध प्रकारच्या कौशल्यांचे ४५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात परिसरातील ९५ महिलांनी सहभाग घेतला होता.

या प्रशिक्षणाचा समारोप नुकताच करण्यात आला. समारोपप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सरपंच शंकर मोहोळ व उपसरपंच महेश गुरव यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या वेळी ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री मोहोळ, स्वाती भरेकर, छाया ढिले, बेबी मोहोळ, सदस्य सोनू भालेराव, ग्रामसेवक संजय चव्हाण, टर्निंग पॉइंट फाउंडेशनचे दत्तात्रेय वाघमारे, गौरी साष्टे, सारिका भाग्यवंत आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT