Paddy  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Plantation : पौष्टिक ‘सुवर्णा’ भाताला पसंती

Team Agrowon

Mahad News : तांदळामध्ये पोषक द्रव्ये असल्याने रोजच्या आहारात प्रत्येक जण भाताचा समावेश करत असतो. सर्वांना आवडणारा तसेच रोजच्या आहारात समावेश असल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन घेतले जाते.

त्यामुळे भातबियाण्यांचे शेकडो विविध प्रकार जरी असले, तरी रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पारंपरिक सुवर्णा जातीच्या भाताला अधिक महत्त्व असल्याने रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागांत सुवर्णा भातालाच अधिक पसंती दिली जाते.

भातबियाण्यांचे सुमारे ९०० प्रकार देशात उपलब्ध आहेत. पारंपरिक भातबियाण्यांबरोबरच संकरित तसेच सुधारित भाताचीदेखील लागवड केली जाते. महाराष्ट्राचा विचार करता कोकणामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

मोठ्या प्रमाणात भातबियाणी जरी विकसित झाली असली, तरी आजही रायगड जिल्ह्यामध्ये पारंपरिक सुवर्णा जातीच्या भातबियाण्याचा वापर अधिक केला जातो. यामुळे जिल्ह्यामधील ग्रामीण भागात घराघरात आहारामध्ये सुवर्णा भातच वापरला जातो.

एक लाख हेक्टरवर लागवड

जिल्ह्यामध्ये सुमारे एक लाख हेक्टरवर भातपिकाची लागवड केली जाते. यापैकी ६० ते ७० टक्के शेतामध्ये सुवर्णा भातबियाणे वापरले जाते. सुवर्णा भात चवीला अतिशय चांगला असतो. या तांदळापासून तयार होणारी भाकरी, घावन, तांदळाची पेज, खीर असे पदार्थ चविष्ट असतात.

यामुळे रायगडातील शेतकरी आपल्या घरी याच भाताचा वापर जेवणासाठी करतो. तसेच घरामध्ये वापरून उरलेला काही तांदूळ बाजारात विक्रीसाठीदेखील आणला जातो. त्यातून शेतकऱ्याला चार पैसेही चांगले मिळतात; परंतु हा तांदूळ आकाराने जाड असल्याने शहरी भागांत याचा वापर भाकरीसाठी होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT