Tomato  Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Price:  माॅन्सूनला उशीर झाल्याने टोमॅटो उत्पादन घटले

Tomato Price Fall : मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने टोमॅटो उत्पादनावर परिणाम झाला. त्यानंतर माॅन्सूनलाही उशीर झाल्याने त्याचा परिणाम टोमॅटो पिकावर झाला.

Team Agrowon

Tomato Price Latest Update : मागील सहा महिन्यात लागवडीच्या काळात टोमॅटो बियाण्याची टंचाई निर्माण होऊन दर वाढले होते. तसेच शेतकऱ्यांना किफायतशीर भाव न मिळाल्याने मोठा आर्थिक फटका बसला होता. सध्या देशातील टोमॅटोच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमागे ही कारणे असल्याचे महाराष्ट्र कृषी विभागाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र देशातील टोमॅटो उत्पादक अग्रेसर राज्य आहे. जुलै ते ऑगस्ट या काळात महाराष्ट्र महत्वाचा टोमॅटो पुरवठादार असतो. महाराष्ट्र कृषी सचिवांनी राज्याच्या कृषी अधिकारी आणि कृषी विद्यापिठांच्या कुलगुरुंसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत टोमॅटोची सद्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. सध्या टोमॅटोच्या दरात झालेल्या वाढीमागील कारणांचा आढावाही घेण्यात आला.

चालू हंगामात म्हणजेच मॅन्सून हंगामता देशातील काही भागांमध्ये टोमॅटो लागवडी होतात. यात महाराषट्रातील पुणे जिल्ह्यातील नारायणगाव आणि जुन्नर भागाचा समावेश आहे. तर कर्नाटकातील बंगळूरु आणि हिमाचल प्रदेशातील सोलन भागातही या काळात लागवडी होतात.

बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती कृषी सचिव सुनिल चव्हाण यांनी दिली. कृषी सचिवांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार टोमॅटो किफायतशीर भाव न मिळाल्याने मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडी कमी केल्या. शेतकऱ्यांना मागील सहा महिन्यांमध्ये म्हणजेच डिसेंबर २०२२ ते मे २०२३ या काळात टोमॅटोला खूपच कमी भाव मिळाला. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ६ ते ९ रुपये होते. मार्च महिन्यात भाव ११ रुपये झाले. तर एप्रिल महिन्यात पुन्हा भावाने ८ ते ९ रुपयांची पातळी गाठली.

मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने टोमॅटो उत्पादनावर परिणाम झाला. त्यानंतर माॅन्सूनही उशीरा आला आणि पाऊस ५४ टक्क्यांनी कमी पडला. याचाही परिणाम टोमॅटो पिकावर झाला, असेही चव्हाण यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT