Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा ही काळाची गरज

शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा ही काळाची गरज आहे, असे मत ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा ही काळाची गरज आहे, असे मत ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी व्यक्त केले.

ग्रामविकास भवन एन-२ सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे गुरुवारी (ता. १३) आयोजित शेतकरी व महिला बचत गट कर्ज वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी संस्थेचे बालाजी बिरादार, वडजीचे पोलिस पाटील विठ्ठल झिने, थेरगावचे सरपंच बंडू रोडगे, राम वाघ, अप्पासाहेब ताकपीर, आबासाहेब गोजरे, बंडू ताकपीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांची सावकारी जाचातून सुटका व्हावी व सन्मानपूर्वक वेळेवर वित्तपुरवठा शेतकरी व महिला बचत गटांना व्हावा याकरिता ग्रामविकास संस्थेच्या पुढाकाराने ग्रामविकास निधी बँकेची स्थापना करण्यात आली आहे.

श्री शिवपुरे पुढे म्हणाले, ‘‘गतवर्षाची वसुली शंभर टक्के झाल्यामुळे यावर्षी वेळेवर कर्ज पुरवठा करणे शक्य झाले. ग्रामविकास संस्था मराठवाड्यात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व शाश्वत ग्रामविकास करिता शेती, जलसंधारण, स्वयंरोजगार प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण इत्यादी प्रकल्प राबवीत आहे.’’

वडजी, सालवडगाव, खोडेगाव, चिंचोली, गेवराई बाशी, गेवराई कुबेर, बोरवाडी तांडा इतर पंधरा गावातील ६० शेतकऱ्यांना व २५ महिला बचत गटांना शेती, पाइपलाइन, शेतीपूरक उद्योग, कृषी सेवा केंद्र, गृह उद्योगाकरिता या कार्यक्रमात कर्ज वितरण करण्यात आले.

यावर्षात ५०० कुटुंबांना कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने समाजातील वंचित घटक, अल्पभूधारक शेतकरी, महिला व युवकांना वित्त पुरवठा बरोबरच प्रशिक्षण व पूरक सेवाही देण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निवृत्ती घोडके व संदीप शिंदे यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT