Banana Agrowon
ताज्या बातम्या

Banana Procurement : केळी खरेदीत तीन टक्के कटती कायम

Banana Farmer : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिध्द आहे. देशात जळगावच्या केळीची मागणी वाढली असली मागणीपेक्षा पुरवठा कमी होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळी खरेदीत जाहीर दरांपेक्षा क्विंटलमागे १०० ते १५० रुपये कमी दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक, लूट करण्याचा प्रकार सुरू आहे. यातच एक क्विंटलमागे तीन टक्के केळीची कटती करण्याचा प्रकारही सर्रास सुरू आहे.

केळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या केळीमालातून ३ टक्के सूट घेऊ नये आणि शेतकऱ्यांनी देखील ही सूट देऊ नये; असे आढळून आल्यास व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय रावेर, यावल, चोपडा व इतर बाजार समित्यांच्या संचालक मंडळांनी अनेकदा जाहीर केला. केळी खरेदी करताना खरेदीदार एक क्विंटल केळीमागे तीन टक्के वजन कमी करून मोबदला देतात. तीन टक्के सूट म्हणूनही या प्रकाराला खानदेशात म्हटले जाते. एक क्विंटल केळी खरेदी करायची आणि मोबदला मात्र ९७ किलोसाठी द्यायचा. त्यात जे दर रावेर, यावल बाजार समिती जाहीर करते, त्या दरांपेक्षा कमी दरात केळीची खरेदी करायची, असा प्रकारही राजरोस सुरू आहे. अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे. परंतु जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा प्रशासन व बाजार समित्या कुठेही कारवाई करीत नाहीत.

जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागांतही कमी दर देणे व कटतीचा प्रकारही सुरू आहे. तीन किलोची सूट बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने यापूर्वीही घेतला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाल्याचे कधीही आढळून आले नाही.

‘घडाच्या दांड्याचे वजन कमी करतो’

केळीच्या फण्यांसोबत दांडा असतो. या केळी घडात दांडा उपयोगात येत नाही. यामुळे त्याचे पैसे कशाला द्यायचे, हा दांडा काही घडांत एक ते दीड किलोचा असतो तर काही घडांत दोन किलोचाही असतो. यामुळे ही कटती केली जाते, असा मुद्दा खरेदीदार उपस्थित करतात. परंतु बॉक्स पॅकिंग करताना केळीच्या फण्या काढल्या जातात, अशा खरेदीतही कटती लावली जाते, अशी तक्रार शेतकरी करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT