Bribe  Agrowon
ताज्या बातम्या

५० लाखांची लाच घेताना तीन अधिकाऱ्यांना अटक

बंधाऱ्याच्या कामाच्या बिलासाठी लाच मागणी; ९ मेपर्यंत कोठडी

टीम ॲग्रोवन

चंद्रपूर : उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांना ब्रमह्मपुरी येथील त्यांच्या राहत्या घरी रविवारी (ता. १) रात्री १० वाजता ५० लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या लाच प्रकरणात थेट सहभागी असलेले नागपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजित पाटील व मृद्‍ व जलसंधारण कार्यालय चंद्रपूरचे विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तिघांनाही चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता ९ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

नागपुरातील एका बड्या कंत्राटदार असलेल्या तक्रारदाराने नागपूर व चंद्रपूर येथील मृद्‍ व जलसंधारण कार्यालय येथे कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाच्या केलेल्या कामाचे बिल तथा वितरित केलेल्या कामाच्या बिलाकरिता आणि उर्वरित बंधाऱ्यांच्या कामाची रक्कम वितरित करण्याकरिता मृद्‍ व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजित पाटील, चंद्रपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे तथा विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम यांनी संयुक्तपणे ८१ लाख २ हजार ५३६ रुपयांची लाच मागितली. इतक्या मोठ्या रकमेची लाच देण्याची तयारी नसल्याने कंत्राटदार तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानुसार चंद्रपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांना रविवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या ब्रह्मपुरी येथील निवासस्थानी ५० लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे व पथकाने मुद्देमालासह पंचासमक्ष अटक केली.

याचवेळी नागपूर व चंद्रपूर येथे संयुक्त कारवाई करताना कविजित पाटील व विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम यांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. नागपूर व चंद्रपूर येथे अनुक्रमे पोलिस निरीक्षक सारंग मिराशी, पोलिस निरीक्षक सचिन मत्ते, पोलिस निरीक्षक प्रवीण लाके, पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरूनुले व पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या अटकेनंतर पाटील, शेंडे व गौतम या तिघांच्याही घरांची तपासणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT