Crop Insurance Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीक नुकसानीबाबत विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचे हजारो दावे

सततच्या पावसाने यंदा अकोला जिल्ह्यात ८८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यातही आलेला आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी सुमारे १२ हजारांवर दावे दाखल केले आहेत.

टीम ॲग्रोवन

अकोला ः सततच्या पावसाने यंदा अकोला जिल्ह्यात ८८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान (Crop Damage Akola) झालेले आहे. याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यातही आलेला आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी सुमारे १२ हजारांवर दावे (Claims To Insurance Companies Regarding Crop Damage) दाखल केले आहेत. तर वाशीम जिल्ह्यात दाव्यांचा हाच आकडा ६४ हजारांवर असल्याची माहिती मिळाली आहे.

यंदा गेल्या दीड महिन्यात सर्वत्र जोरदार पाऊस झालेला आहे. अकोल्यात ८८ हजार, तर वाशीम जिल्ह्यात सुमारे एक लाख १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. दोन्ही जिल्हे मिळून दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. या दोन्ही जिल्ह्यांत सोयाबीन हेच प्रमुख पीक असून, या मुख्य पिकालाच अधिक तडाखा बसला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस ऑगस्टच्या मध्यापर्यंत काही दिवसांचा कालखंड वगळता सारखा झाला.

परिणामी, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातही बऱ्याच मंडळांमध्ये अतिवृष्टीने कहर केला. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसुद्धा शेतकऱ्यांमधून झालेली आहे. या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून विमा कंपन्यांकडे अर्ज दाखल केले जात आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत अकोला जिल्ह्यात १२ हजार ९८ शेतकऱ्यांचे अर्ज आहेत. तर वाशीम जिल्ह्यात ६४ हजार १७६ शेतकऱ्यांनी अर्ज दिल्याचे सांगितले जाते. पीक नुकसानीनंतर शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवणे आवश्‍यक राहते.

यासाठी शेतकरी क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन ॲपचाही वापर करतात. किंवा कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करीत असतात. अकोला जिल्ह्यात बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर, तर वाशीममध्ये रिसोड, मंगरूळपीर, वाशीम तालुक्यांतील शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झालेले आहे.

मदतीची प्रतीक्षा

शेतकऱ्यांच्या नुकसानाचे अंतिम अहवाल अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेले आहेत. अकोल्यात ८८ हजार हेक्टर व वाशीम जिल्ह्यात १.१५ लाख हेक्टरवरील नुकसानीबाबत त्यात कळवण्यात आलेले आहे. शासनाने यंदा नियमित मदतीपेक्षा दुप्पट मदत देण्याची घोषणा केली आहे. अद्याप हा निधी देण्याबाबत कुठलेही आदेश किंवा निधी जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही. शेतकरी या मदतीची आस लावून बसले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT