Tur Market Agrowon
ताज्या बातम्या

Tur Market : तूर उत्पादनात यंदाही मोठ्या वाढीची आशा धुसरच

Tur Import : यंदा माॅन्सूनचा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तुरीची पेरणी कमी झाली आहे. त्यामुळे यंदाही तुर उत्पादनासाठी अनुकूल स्थिती दिसत नसल्याचं जाणकार सांगत आहेत.

Team Agrowon

Pune News : मागील हंगामात देशातील तूर पिकाचे नुकसान झाल्यामुळे दरात मोठी तेजी आली. यंदाही महात्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे लागवडी सध्या निम्म्यापेक्षा कमी दिसतात. एकूणच यंदाही तुर उत्पादनासाठी अनुकूल स्थिती दिसत नसल्याचं जाणकार सांगत आहेत.

कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ४६ लाख ३२ हजार हेक्टरवर कडधान्य लागवड झाली. गेल्या हंगामात याच काळातील लागवड ५६ लाख ४३ हजार हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा कडधान्य लागवड १८ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. महाराषट्रात कडधान्या लागवड केवळ ४ लाक हेक्टरवर झाली. मागील हंगामात याच काळातील लागवड ९ लाख ४६ हजार हेक्टरवर होती. तर कर्नाटकातील लागवड यंदा ६ लाख हेक्टरवर पोचली. गेल्या हंगामातील लागवड १३ लाख हेक्टर होती.

या सोबत मध्य प्रदेशही कडधान्य लागवडीत महत्वाची भुमिका पार पाडते. मध्य प्रदेशात कडधान्य लागवडीची स्तिती काहीशी चांगली दिसते. पण लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमीच आहे. मागील हंगामात मध्य प्रदेशात ९ लाख ५३ हजार हेक्टरवर कडधान्य लागवड होती. ती यंदा ८ लाख ६१ हजार हेक्टरवर पोचली. तेलंगणातील लागवडही कमीच आहे. तर उत्तर प्रदेशातील लागवड क्षेत्रात एक लाख हेक्टरने घट आहे.

सध्या तुरीच्या दरात मोठी तेजी आली आहे. देशात तुरीचा पुरवठा कमी असल्याने दर टिकून आहेत. तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारने आयात वाढवली, स्टॅक लिमिटही लावले. पण तूर पुरवठ्याची खरी भीस्त आहे ती देशातील उत्पादनावरच. त्यामुळे सरकारने चालू हंगामात देशातील तूर उत्पादन वाढीवर जोर दिला. त्यासाठी हमीभावाने शेतकऱ्यांकडून तूर खरेदीची मर्यादा काढली. आता शेतकरी कितीही तूर हमीभावाने विकू शकतात.

पण खरा प्रश्न आहे तो पावसाचा. देशातील महत्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात चांगला पाऊसच झाला नाही. त्यामुळे तूर लागवड पिछाडीवर आहे. गेल्या हंगामात देशात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १९ लाख ३४ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली होती. तर यंदा केवळ १० लाख ३२ हजार हेक्टर तुरीखाली आले. पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात चांगला पाऊस राहिला तरचं तूर उत्पादनाचं चित्र आशादायक ठरु शकतं. पण सध्याच्या परिस्थितीवरून यंदाही तूर उत्पादन कमीच राहील असं चित्र दिसतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

SCROLL FOR NEXT