Ujani Dam Agrowon
ताज्या बातम्या

Ujani Dam : उजनी तेरा टक्क्यांवर

Ujani Dam Water Level : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीची पाणीपातळी देखील वाढलेली नाही. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी अजून समाधानकारक स्थितीत नाही.

Team Agrowon

Solapur News : पावसाळा सुरू असतानाही ऑगस्टमध्ये सरासरीच्या १५ टक्केसुद्धा पाऊस पडलेला नाही. जिल्ह्यात ऊस वगळता तीन लाख २५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात तूर, मूग, उडीद, मका, सोयाबीन, सूर्यफूल व भुईमुगाचा समावेश आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीची तयारी केली आहे, पण रोपांनाही पाण्याची ओढ बसत आहे.

यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीची पाणीपातळी देखील वाढलेली नाही. जिल्ह्याची वरदायिनी उजनी अजून समाधानकारक स्थितीत नाही. तसेच जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांनी देखील तळ गाठला आहे. पाऊस न पडल्यास पावसाळ्यात दुष्काळी स्थिती निर्माण होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.

तीन लाख हेक्टरवरील पिकांना पाण्याची ओढ

जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर यासह इतर तालुक्यांमध्ये यंदा तीन लाख २५ हजार १८३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्र कोरडवाहू (हंगामी बागायत) आहे.

आमदार गप्प अन्‌ प्रशासनाचा निर्णय होईना

प्रत्येक तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची चिंता पाहून खरीप पिकांना उजनीतून एक आवर्तन सोडण्याची मागणी करणे अपेक्षित आहे. पण, बहुतेक आमदारांनी अद्याप लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे तशी मागणी केलेली नाही. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT