ताज्या बातम्या

Irrigation : गडहिंग्लजमध्ये यंदा पाणी नियोजन ‘रामभरोसे’च

पावसाळ्यात नदीसह विविध प्रकल्पांमध्ये साठलेल्या पाण्याचे नियोजन ऑक्टोबरमध्ये करणे अपेक्षित असताना यंदा अजूनही नियोजनाच्या बैठकीचा पत्ता नाही.

टीम ॲग्रोवन

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : पावसाळ्यात नदीसह विविध प्रकल्पांमध्ये (Water Project) साठलेल्या पाण्याचे नियोजन (Water Planning) ऑक्टोबरमध्ये करणे अपेक्षित असताना यंदा अजूनही नियोजनाच्या बैठकीचा पत्ता नाही. यामुळे यंदाच्या पाण्याचे नियोजन ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.

सध्या रब्बीसह नवीन ऊस लागवड आणि उन्हाळ्यातील आवश्यक पाण्याचे नियोजन करण्यासाठी हिरण्यकेशी पाटबंधारे विभाग कधी जागे होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. चित्री, आंबेओहोळ मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गाचे आणि तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणी वापराचे नियोजन पावसाळ्यानंतर केले जाते.

कालवा सल्लागार समितीकडून पावसाळ्यात साठलेल्या पाण्याचे नियोजन होत असते. या नियोजनासाठी ऑक्टोबर अखेरपर्यंत समितीची बैठक अपेक्षित असते. बैठकीत रब्बी हंगामासह नवीन ऊस लागवड आणि इतर पिकांना, तसेच उन्हाळ्यातील पाणी आवर्तनाचे नियोजन केले जाते.

या बैठकीतील सूचनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी पाटबंधारे विभागावर असते. मात्र, अलीकडील काही वर्षांपासून वेळेत बैठक घेऊन पाणी नियोजन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गतवर्षीसुद्धा नियोजनाची बैठक जानेवारीत झाली होती. उशीर झाल्याबद्दल तत्कालीन अधिकाऱ्यांना तेव्हा दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. तरीही यावर्षीच्या बैठकीचा अद्याप पत्ता नाही. परिणामी, पाणी नियोजनाबाबत पाटबंधारेची उदासीनता यंदाही कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT