Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : नऊ तालुके कृषी अधिकाऱ्यांविनाच

Kharif Season 2023 : खरीप हंगामाची लगबग वाढली असताना असताना शासनाच्या विविध योजना राबविण्याकरिता कृषी विभागाकडे पुरेसे मुनष्यबळ मात्र उपलब्ध नाही.

Team Agrowon

Amravati News : खरीप हंगामाची लगबग वाढली असताना असताना शासनाच्या विविध योजना राबविण्याकरिता कृषी विभागाकडे पुरेसे मुनष्यबळ मात्र उपलब्ध नाही. जिल्ह्यातील चौदापैकी नऊ तालुक्यात तालुका कृषी अधिकारी नाहीत. उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांनी खरीप आढावा बैठकीत रिक्त पदांचा अनुशेष तातडीने भरण्याची घोषणा केली, मात्र ती हंगाम सुरू झाला तरी पूर्णत्वास गेली नसल्याने या घोषणा हवेत विरू लागल्या आहेत.

अनुदानावरील बियाणे वाटपासह खरीप हंगामात बाजारातील बियाणे व खतांची उपलब्धता यांसह शेतकऱ्यांसाठी असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत करण्यात येते.

तालुका पातळीवर त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या योजना राबविण्यात येतात. अमरावती जिल्ह्यात चौदा तालुक्यांसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे चौदा तालुका कृषी अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून रिक्त पदांचा अनुशेष वाढत जात आहे.

राज्यातील १७४ मंडळ निरीक्षकांच्या तालुका कृषी अधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आल्या आहे. यातील कुणाचीही नियुक्ती अमरावती जिल्ह्यात करण्यात आली नाही. परिणामी रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे.

यामुळे सद्यःस्थितीत असलेल्या उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. प्रभारींच्या भरवशावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गाडा वाहून नेत असले तरी योजना राबविताना व अंमलबजावणी करताना त्यांची तारांबळ उडू लागली आहे.

अधिकाऱ्यांना फैलावर धरत असले तरी रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मात्र कोणताच लोकप्रतिनिधी पुढाकार घेताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री खरीप हंगाम आढावा बैठकीस आले असताना त्यांच्या निदर्शनास रिक्त पदांचा अनुशेष जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांनी आणून दिला. त्यावेळी त्यांनी तातडीने पदे भरण्याची ग्वाही दिली होती. मात्र खरीप हंगामास सुरुवात होत असतानाही रिक्त पदे जैसे थे च आहेत.

या तालुक्यात प्रभारींवर भार

चिखलदरा येथील तालुका कृषी अधिकारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तर, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, अंजनगावसुर्जी, वरूड, चांदूर बाजार व अमरावती या तालुक्यांना कृषी अधिकारीच नाहीत. या रिक्त पदांचा कारभार कनिष्ठ अधिकारी प्रभारी म्हणून हाकत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT