Crop insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop insurance : तुळजापूर तालुक्यातील पीकविम्याच्या याद्यांचे काम पूर्ण’

तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२०चा पीकविमा मिळण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम तालुका कृषी कार्यालयाकडून पूर्ण झाले आहे.

Team Agrowon

तुळजापूर ः तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२०चा पीकविमा (Crop insurance) मिळण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम तालुका कृषी (agriculture) कार्यालयाकडून पूर्ण झाले आहे.तालुक्यातील ६२ हजार शेतकऱ्यांना ४६ कोटी रूपये २०२० च्या पीकविम्याची रक्कम सद्यपरिस्थितीत मिळणार आहे.

प्रति हेक्टरी ६ हजार ६३९ रूपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तालुका कृषी कार्यालयाने शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या याद्या तयार केलेल्या आहेत. स्टेट बॅक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक, तसेच अन्य बँकांना याद्या आजच सुपूर्द करण्याचे काम केलेले आहे. तसेच अन्यही संबधित बँकांना याद्या देण्याचे काम चालू आहे.

शेतकऱ्यांना सदरची रक्कम येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात हातात मिळणार आहे. अतिपावसामुळे शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणावर सध्या खराब झालेली आहे. रब्बी पेरणीचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.तालुक्यातील ६२ हजार शेतकऱ्यांना ४६ कोटी रूपयांची पीकविम्याची २०२० ची रक्कम मिळणार आहे.

तालुका कृषी कार्यालयाने याद्या तयार केलेल्या आहेत. बॅकेत शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या पाठवायचे काम चालू आहे. आजच महाराष्ट्र ग्रामीण बॅक तसेच अन्य बॅकांनाही याद्या पाठवल्या आहेत.

- संजय जाधव, तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT