Rural Story  Agrowon
ताज्या बातम्या

Rural Development : गाव आमचं, निसर्गसंपत्तीही आमचीच

ग्रामपंचायतीच्या या निर्णयाची परिसरात चर्चा असून येत्या काळात जोयद्याचे अनुकरण करून असे ठराव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

शिरपूर : गाव (Village) आपलं आहे. म्हणून गावाच्या परिसरातील निसर्ग (Nature) संपत्तीही आपलीच आहे. आपल्या परिसरात काय करायचे ते आपण ठरवू असे निश्चित करीत जोयदा (ता.शिरपूर) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत (Grampanchyat Tharav) विशेष ठराव करून त्याची प्रत प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे दिली.

ग्रामपंचायतीच्या या निर्णयाची परिसरात चर्चा असून येत्या काळात जोयद्याचे अनुकरण करून असे ठराव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.

जोयदा ग्रामपंचायत पेसा क्षेत्रात आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांचे हित लक्षात घेऊन गाव हद्दीतील गौण खनिजे, वन उत्पादने आदींवर हक्क आणि वनपट्ट्यातील जमिनीवर विहीर व कूपनलिका तयार करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. पाठोपाठ या ठरावाची प्रत प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आली.

गाव परिसरातील नैसर्गिक संसाधनांवर गावाचा मालकी हक्क असावा अशा भूमिकेतून ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

ग्रामसभेत गावाच्या हद्दीतील माती, मुरूम, वाळू, डबर, दगडगोटे, वनउत्पादनांचा वापर आणि मालकी हक्क ग्रामसभेला म्हणजेच गावकऱ्यांना असल्याचा ठराव संमत करण्यात आला.

वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी वनपट्ट्यात शेती सिंचनासाठी विहीर आणि कूपनलिका तयार अधिकार गावाला असल्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. अशा स्वरूपाचा ठराव करणारी जोयदा ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

गावकऱ्यांना गौण खनिजे, नैसर्गिक संसाधनावंर हक्क मिळावा, स्वत:च्या वनपट्ट्यात पाण्याची सोय करण्याचे स्वातंत्र्यही मिळावे, अशा भूमिकेतून हा ठराव करण्यात आला आहे. दिवसेंदिवस नैसर्गिक साधनांचा व्यापारी तत्त्वावर वापर वाढत असून त्यामुळे ग्रामीण भागाला गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण झाला आहे. गावाभोवतालचे पर्यावरण सुरक्षित राहावे, त्यावर बाह्य अतिक्रमण होऊ नये अशी आमची मागणी आहे.
विलास पावरा, विभागीय अध्यक्ष, बिरसा फायटर्स

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT