Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाच्या झळा; तापमानातील तफावत वाढली

राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कमाल तापमानाचा पारा पस्तिशीपार गेला असतानाच किमान तापमानात घसरण झाल्याने राज्यात गारठा वाढला आहे.

Team Agrowon

Weather Update Maharashtra पुणे : राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची (Heat) चाहूल लागली आहे. कमाल तापमानाचा (Maximum Temperature) पारा पस्तिशीपार गेला असतानाच किमान तापमानात घसरण झाल्याने राज्यात गारठा (Cold Weather) वाढला आहे.

कमाल-किमान तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाच्या झळा अशीच स्थिती अनुभवायला मिळत आहे. रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानातील घट कायम आहे. रविवारी (ता. १२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

पुणे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद येथेही किमान तापमानात घट झाली आहे. आज (ता. १३) राज्याच्या किमान तापमानातील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.

निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान पस्तिशीपार गेले असल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सोलापूर, वर्धा येथे तापमान ३६ अंशांवर पोचले असून, अनेक ठिकाणी पारा ३५ अंशाच्या वर सरकला आहे.

कमाल आणि किमान तापमानात १६ ते ३० अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे गारठा असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाचा झळा असह्य होत आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे.

रविवारी (ता. १२) राजस्थान येथील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.७ (१०.७), जळगाव ३४.४ (१०.१), धुळे ३४.०(९.०), कोल्हापूर ३४.८(१८.७), महाबळेश्वर ३१.४ (१६.४), नाशिक ३३.५ (१०.२), निफाड ३५.२ (५.५), सांगली ३५.४ (१७.७), सातारा ३५.२ (१४.४), सोलापूर ३६.६ (१६.६),

सांताक्रूझ ३४.४ (१६.६), डहाणू ३१.१ (१७.६), रत्नागिरी ३४.०(१७.५), औरंगाबाद ३४.४ (१०.४), नांदेड ३४.८ (१६.२), परभणी ३५.७(१५.६), अकोला ३७.४ (१४.५), अमरावती ३५.८(१४.१), बुलडाणा ३३.०(१७.०), ब्रह्मपुरी - (१६.८),

चंद्रपूर ३४.४(१८.५), गडचिरोली ३२.६(१२.८), गोंदिया ३४.२ (१३.८), नागपूर ३५.८ (१५.८), वर्धा ३६.५(१५.८), यवतमाळ ३५.० (१४.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT