Old Pension Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Old Pension Scheme : संपातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार कमी

जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता

Team Agrowon

Nagpur News : संपातील कर्मचाऱ्यांवर शासनाकडून कारवाईचे अस्त्र उगारण्यात आले आहे. ‘नो वर्क-नो पे’ धोरण (No Work No Pay Policy) शासनाने अवलंबिले असून संपात सहभागी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता ‘असाधारण रजा’ म्हणून नियमित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. त्यामुळे संपात सहभागी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात कमी पगार मिळणार आहे. (Old Pension Scheme Protest)

जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कामकाज विस्कळीत झाले. नागरिकांनाही त्रास झाला. शासकीय कामकाजाचे सहा दिवस हा संप होता.

दरम्यान शासनाने संपातील कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईच्या नोटीसही बजावल्या. संप मिटविण्यात सरकारला यश आले. जुनी पेन्शनसाठी समितीच्या माध्यमातून तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाला दिले.

परंतु पदरात ठोस काहीच मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींचा कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. संपातील कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

परंतु आता शासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही पहिल्या टप्प्यातील कारवाई असून पुढे ज्यांना नोटीस मिळाल्या त्यांच्यावरही कारवाई होण्याची भीती व्यक्त करण्‍यात येत आहे.

संपातील कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारीची कारवाई होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु आता वेतन कपात करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार कपात होता कामा नये. या आदेशात दुरुस्ती करावी.
- सुभाष पडोळे, अध्यक्ष, म.रा.जि.प. कर्मचारी युनियन, नागपूर शाखा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT