Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department News: ठाण्यातील भूखंडावर ‘कृषी’चे पाणी

कृषी विभागाच्या ताब्यात असलेल्या मौल्यवान भूखंडांना हळूहळू पाय फुटू लागले आहेत.

Team Agrowon

Pune News : कृषी विभागाच्या (Agriculture Department) ताब्यात असलेल्या मौल्यवान भूखंडांना (Land) हळूहळू पाय फुटू लागले आहेत. सिल्लोड येथील भूखंडवाटप चर्चेत असतानाच ठाण्यात कृषी खात्याच्या ताब्यात असलेली कोट्यवधी रुपयांची जागा काढून घेण्यात आली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ठाण्याच्या वागळे इस्टेटमधील कृषी विभागाच्या मालकीची १.९३२ हेक्टर जागा राज्य शासनाने काढून घेतली आहे.

ही जागा समूह विकास योजनेसाठी ठाणे महापालिकेला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे काही अधिकाऱ्यांना इच्छा असूनही विरोध दर्शविता आला नाही. ही जागा पूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीची होती. जिल्हाधिकाऱ्यांनी १९९४ मध्ये कृषी विभागाला अधिकृतपणे ही जागा दिली होती.

परंतु याच जागेची मागणी ठाणे महापालिकेने विकासासाठी मागितली. कृषी खात्याने हा भूखंड तत्काळ खाली करावा, असे आदेशदेखील जारी करण्यात आले आहेत.

कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ठाण्यातील मोठी जागा कृषी विभागाला गमावावी लागत असल्याची खंत आहे. मात्र जागेच्या मोबदल्यात पर्यायी भूखंड कृषी विभागाला द्यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

याशिवाय सध्याच्या बांधकामाच्या दीडपट बांधकाम करुन दिले जाणार आहे. त्यामुळे कृषी विभागाचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

वागळे इस्टेटमधील कृषी विभागाची सर्व कार्यालये आता तात्पुरत्या स्वरुपात इतर ठिकाणी हलविण्यात येणार आहेत. त्याचा खर्च महापालिका देणार आहे. दरम्यान, सध्याचा कृषी खात्याचा भूखंड कृषी खात्याकडून आधी महसूल विभागाच्या ताब्यात जाणार आहे.

जमीन फेरफार नोंदी व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही जागा ठाण्याच्या महापालिका आयुक्तांकडे वर्ग होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

पर्यायी जागेत ‘कृषी’ला मोफत सुविधा

वागळे इस्टेटमधील कृषी विभागाची जागा तत्काळ काढून घेण्यात आली आहे. कृषी विभागाला पक्की पर्यायी जागा मिळण्यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात कशिरा पार्क भागात कृषी कार्यालये स्थलांतरित केली जातील. नव्या जागेत कृषी विभागाला कार्यालयीन साहित्य, पाणी, वीज, सुरक्षा तसेच स्वच्छता सेवा मोफत पुरवा, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

बाळकूममधील २.२७ हेक्टरचा भूखंडाचा पर्याय

कृषी विभागाला या भूखंडाच्या बदल्यात ठाण्याच्या मौजे बाळकूम येथील २.२७ हेक्टरचा भूखंड मिळणार आहे. याशिवाय ६६४० चौरस मीटरचे बांधकाम तयार करुन दिले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Pre-Cultivation: शेतांची पूर्वमशागत सुरू

Rajshree Yojana: मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘राजश्री योजना’; ५० हजारांची मदत

Siddheshwar Sugar Factory: ‘सिद्धेश्‍वर’ला थकहमी;मात्र कर्ज मंजुरीची प्रतीक्षा

Grain Festival: कोल्हापुरात धान्य महोत्सवास प्रारंभ

Drip Irrigation: ‘ठिबक’चे साडेचार कोटी मार्चअखेर मिळणार

SCROLL FOR NEXT