soybean agrowon
ताज्या बातम्या

उदगीर बाजारात सोयाबीन आवक घटली

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.

Team Agrowon

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन(soybean) बाजारांपैकी एक असलेल्या उदगीर बाजारामध्ये आज 7 मे रोजी 1900 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 7050 रुपये ते कमाल 7130 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 7090 रुपयांनी झालेत. उदगीर बाजारात आज सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली होती. तिकडे हिंगोली बाजारात 199 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 6590 तर कमाल 6949 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6769 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे जिंतूर बाजारात किमान 6760 रुपये तर कमाल 6951 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6826 होता.

अमरावती बाजारात सोयाबीनची आज 7 मे रोजी 1489 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6550 रुपये तर कमाल 6853 रुपये दर(rate) मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6702 रुपयांवर होता. अमरावती बाजारात आज सोयाबीन आवक काहीशी घटली होती. कारंजा बाजारात सोयाबीनची 800 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6440 रुपये होता. तर कमाल भाव 7050 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6875 चा भाव मिळालाय. नागपूर बाजारात आवक 318 क्विंटल राहिली. यावेळी या सोयाबीनला किमान 6000 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 7000 रुपयाने झाले. सरासरी दर 6750 रुपये मिळाला. तसेच सिंदी बाजारातील आवक 55 क्विंटलवर होती. यावेळी सोयाबीनला 5635 रुपये दर मिळाला. तर कमाल दर 6605 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6015 रुपये मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT