Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

Abdul Sattar : सिल्लोड महोत्सव सत्तारांच्या अंगाशी ?

राजीनाम्याच्या मागणीसाठी विधासभेत प्रचंड गोंधळ; कामकाम तहकूब

Team Agrowon

बाळासाहेब पाटील : ॲग्रोवन वृत्तसेवा 

नागपूर : सिल्लोड महोत्सवात (Sillod Festival) कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकरवी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी कोटींची वसुली सुरू असल्याचा आरोप आणि घोडबाभूळ (जि. वाशिम) येथील ३७ एकर सरकारी गायराण जमीन बेकायदेशीरपणे विक्री, या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घाला. विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कृषिमंत्र्यांवर जोरदार टिका केली. यावेळी विरोधकांनी घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. विरोधकांनी कृषीमंत्री सत्तार यांच्या राजीमान्याची मागणी लावून धरत जोरदार गोंधळ घातल्याने सभागृहाचे  कामकाज आधी एक तासांसाठी आणि नंतर पूर्ण दिवसासाठी तहकूब झाले.

सिल्लोड महोत्सावासाठी १५ कोटी वसुलीचे टार्गेट या शीर्षकाचे वृत्त दै. ॲग्रोवनमध्ये रविवारी प्रसिद्ध झाले होते. याची दखल सभागृहात घेण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ॲग्रोवनमध्ये आलेल्या वृत्ताचा दाखला देत प्रवेशिका खपविण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट दिल्याचे सांगितले. काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी ॲग्रोवनचा अंक दाखवत सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

या मुद्द्यावर गोंधळ सुरू असतानाच विधानसभा अध्यक्षांनी कामकाज पुकारल्याने आमदार आक्रमक झाले. विरोधी आमदारांनी वेलमध्ये धाव घेत, ‘राजीनामा द्या राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या’, ‘सत्तारने घेतलेत खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके’, ‘श्रीखंड घ्या कुणी भुखंड घ्या’ अशा घोषणा दिल्या. विधानभवनाच्या पायऱ्यांवरही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत वातावरण तापवले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
 

अजित पवार यांनी सत्तार यांच्याबाबत स्थगन प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दालनात फेटाळला. मात्र, नियम ३५ अन्वये अब्दुल सत्तार यांनी महसूल राज्यमंत्री असताना गायराण जमीन परस्पर विक्रीप्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सिल्लोड महोत्सवासाठी सुरू असलेल्या वसुलीचा मुद्दा उपस्थित केला. या दोन्ही प्रकरणावर सत्तार यांनी राजीनामा देण्याची मागणी  केली. दरम्यान, सिल्लोड महोत्सवावर विरोधी पक्षनेते बोलत असताना अध्यक्षांनी रोखल्याने विरोधी आमदार आक्रमक झाले. यावेळी अजित पवार यांनी ‘मी तुमच्या आधीपासून सभागृहात आहे. हा विषय अतिशय गंभीर आहे. त्यामुळे बोलू देणार नाही, असे चालणार नाही’.


काय म्हणाले अजित पवार?
1. सिल्लोड महोत्सवासाठी २५ ते ३० कोटी रुपयांची वसुली सुरू आहे. कृषी संचालक पैसे गोळा करण्याचा कामाला लागले आहेत.

2. कृषी उद्योग कंपन्या, खते, कीटकनाशके, बियाणे विक्रेते, संघटना, कृषी यंत्रे पुरवठादार 

अशा सर्वांकडून वसुली सुरू आहे.

3. दहापेक्षा जास्त तालुके असलेल्या जिल्ह्यांतून २५ हजार रुपयेचे ३० प्लॅटिनम प्रवेशिका, १५ हजार रुपयांच्या ५० डायमंड, १० हजार रुपयांच्या ७५ गोल्ड आणि साडेसात हजार रुपयांच्या  १५० सिल्व्हर प्रवेशिक अधिकाऱ्यांना खबविणे बंधनकारक केले आहे. दहापेक्षा कमी तालुके असलेल्या जिल्ह्यात १५ हजारांच्या १५ प्लॅटिनम, १५ हजार रुपयांच्या २५ डायमंड, १० हजार रुपयांच्या ४० गोल्ड आणि ७५ हजार रुपयांच्या ७५ सिल्व्हर प्रवेशिका जिल्हात गुणवत्ता निरीक्षकांनी खपवाव्यात असा फतवा काढला आहे. 


4. राज्यातील निविष्ठा उद्योगांचे परवाने दिलेल्या कंपन्यांनाही प्रवेशिका खपविण्याचे  टार्गेट दिले आहे. 


5. सिल्लोड येथे घेण्यात येणाऱ्या कृषी महोत्सवातील बैलगाडी शर्यतीसाठी सांस्कृतिक विभागाने निधी दिला आहे. तर कृषी विभागानेही काही निधी दिला आहे. बाकी पैसे वसुली करून मिळविले जात आहे. हा मोठा भ्रष्टाचार आहे. या प्रकरणी कृषीमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. 

गेल्या सहा महिन्यांपासून कृषीमंत्री वादग्रस्त ः पवार

गेल्या सहा महिन्यांपासून कृषीमंत्री वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, भ्रष्ट कामे करत आहेत. तरीही तुम्ही पाठीशी घालता आहात, असा सवाल अजित पवार यांनी केला. कधी महिला खासदारांना अर्वाच्च्य शिवीगाळ केली जाते. कधी जिल्हाधिकाऱ्यांना चहा घेत नाही मग दारु पिता का? असे विचारतात, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. 

कृषीमंत्री सत्तार गायब 

सिल्लोड महोत्सव आणि गायराण जमीन प्रकरणावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांचे स्वीय सहायक आणि विशेष कार्यकारी अधिकारी मात्र विधानसभेत अधिकारी कक्षात उपस्थित होते. महोत्सवाच्या वसुलीमुळे  पिचलेल्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना फोन करत सुटकेचा निश्वास सोडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT