River Conservation  Agrowon
ताज्या बातम्या

River Conservation : नद्यांच्या स्वच्छतेसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची

‘चला जाणूया नदीला’ या अभियानात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. युवकांनी स्वयंप्ररेणेने काम करून आपल्या नद्यांना पुन्हा अमृत वाहिनी बनवण्यासाठी प्रयत्न करावे, असे जल बिरादरीचे संस्थापक डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

Team Agrowon

River Conservation पुणे : ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात (River Campaign) युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. युवकांनी स्वयंप्ररेणेने काम करून आपल्या नद्यांना पुन्हा अमृत वाहिनी बनवण्यासाठी प्रयत्न करावे, असे जल बिरादरीचे संस्थापक डॉ. राजेंद्र सिंह (Dr. Rajendra Singh) यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय नद्यांसाठीच्या कृती दिवसाच्या औचित्याने राज्य शासन आणि जल बिरादरी यांच्या विद्यमाने सुरू असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ अभियानातील युवा जलप्रहरींचा गौरव सोहळा फर्ग्युसन महाविद्यालयात गुरुवारी (ता. १६) झाला.

त्या वेळी डॉ. सिंह बोलत होते. या वेळी नगरविकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, शिक्षणतज्ज्ञ देवयानी गोविंदवार, ‘युनिसेफ’च्या सल्लागार प्रियांका शेंडगे, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रूपाली गायकवाड, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक प्रदीप वाल्हेकर, जल बिरादरीचे राष्ट्रीय युवा संयोजक गिरीश पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी स्नेहा किसवे-देवकाते, व्यंकटेश दुर्वास, देवयानी गोविंदवार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी मनोज बोरगावकर लिखित ‘नदीष्ट’ कादंबरीचे अभिवाचन ‘द कुलाबा टीम’च्या गटाने केले.

या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ११ नद्यांचा समावेश असून, पवना नदीची यात्रा आयोजित करण्यात आली होती.

या यात्रेत ३० पदयात्री पूर्णवेळ सहभागी होते. त्यांनी नदी, तिच्यावर अवलंबून असलेल्या परिसंस्था, नदीकाठची गावे व त्यांची जीवनशैली, व्यवसाय या विषयावर नृत्य, गायन, चित्र, काव्यवाचन, संवाद आदी माध्यमांद्वारे आपला अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या वेळी यात्रेत सहभागी झालेल्या पदयात्रीचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business Crisis: पशुखाद्य, चारा महागल्याने दूध व्यवसाय आतबट्ट्यातच

Sick Bull Controversy: सरकारी बैलाला आजाराची बाधा

Diesel Sales Restriction: दर दिवशी मिळणार २०० लिटरच डिझेल: केंद्र सरकारचा निर्णय

Horticulture Production: फलोत्पादनाचा उच्चांक

Maharashtra Dairy Sector: गोरस भंडार संकटावर तोडगा; दूध उत्पादकांनी उभारली पर्यायी वितरण व्यवस्था

SCROLL FOR NEXT